Skip to content
अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 21 व्या वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्य गुणी जणांचा सत्कार व विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरात गेल्या 21 वर्षापासून नेकीने सामाजिक बांधिलकी जपून सर्वसामान्य माणसांचा अर्थिक स्तर उंचावला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या थाटमाटात आणि उत्साहाचे वातावरणात पार पडली. सामाजिक दायित्व आणि सामाजिक चांगुलपणा या भुमिकेतून समाजातील निष्पृहपणे काम करणार्या पत्रकारांचा, वैद्यकिय क्षेत्रातील गुणीजणांचा आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही मर्यादित राहिलेली नाही तर अमर्याद झालेली आहे. म्हणून सर्वसाधारण सभेेला सर्व जाती धर्मातील नागरिक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंबाजोगाई शहरातील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फंक्शन हॉल या ठिकाणी या सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवार दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी अलखैर पतसंस्थेचे चेअरमन शेख उमर फारुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, अहमदनगर येथील अर्किटेक अर्शद शेख, शिक्षणविस्तार अधिकारी अशोक घोरपडे, जमियत ए-उलमाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष मौलाना अकबर इशाती, ऑल इंडिया उलेमा बोर्डचे मराठवाडा अध्यक्ष नजीर अहेमद आदी मान्यवर उपस्थित होते. तर व्यासपीठावर पतसंस्थेचे उपाध्यक्ष खतीब मोहम्मद मुजम्मील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन शेख उमर फारुक यांनी पतसंस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा सादर केला. ज्यामध्ये पतसंस्थेने गेल्या वर्षभरामध्ये जे काही समाजहिताचे आणि लोकहिताचे काम केले याची उजळणी केली. अनेक संकल्प त्या ठिकाणी बोलून दाखविले. थोडा है थोडे की जरुरत है म्हणत जे काही संकल्प आणि स्वप्न तुम्ही आणि आम्ही पाहिले आहेत त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आपला अल्लाह तत्पर आहे. जिथे नेकी आहे तेथे अल्लाह आहे त्यामुळे जी जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे ती प्रमाणिकपणे पार पाडण्यासाठी आपला प्रयत्न राहिले असे शेख उमर फारुक यांनी सांगितले.

21 वर्षाचा कालखंड कधी निघून गेला हे सभासदांच्या व ग्राहकांच्या प्रेमामुळे व सहकार्यांमुळे कळलेही नाही. अनेक योजना राबविण्याचा प्रयत्न येत्या काळात आपण करणार असल्याचे सांगितले तर रमेशराव आडसकर यांनी पतसंस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत अलखैर नागरी सहकारी पतसंस्था सारख्या अणखी संस्था उदयास आल्या तर समाजातील आर्थिक दारिद्रय कमी व्हायला वेळ लागणार नाही. सचोटीने आणि प्रामाणिकपणाणे काम केल्यानंतर त्याचा निर्णय हा सकारात्मक येत असतो. एक चांगले संघटन कौशल्य असलेले सर्व संचालक मंडळ यांच्या प्रामाणिकपणामुळेच 21 वर्ष अखंडितपणे काम करण्याची संधी मिळाली असल्याचे आडसकर यांनी सांगितले तर पिस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रसिद्ध अर्किटेक अर्शद शेख यांनी उपस्थितांशी संवाद साधत जे काही वास्तविकता आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला समाजातील वाईट चालीरिती, प्रथा परंपरा बंद करुन प्रगत समाज घडवायचा असेल तर सोबतची माणसं ही ध्येयवेडी आणि निस्वार्थी असावी लागतात. कारण आज अनेक संस्था उद्यास येतात आणि लोप पावतात त्याचे प्रमुख कारण म्हणजे स्वार्थ आहे. ज्यानी ज्यांनी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला त्या त्या संस्था डबघाईस आल्या. नेकीने काम करणार्याला अल्लाह सुद्धा कधी काही कमी पडू देत नाही उलट पाठीवर शाबासकीची थाप देवून पुढे जाण्यासाठी दुआ देत असतो. अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही देशभरात एक आदर्श मॉडेल म्हणून पुढे आली आहे. देशभरामध्ये चेअरमन यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केेले जात आहे हे काम तसे पाहिले तर सोपे नाही कारण पाणी राखून पिणे न पिणे ही अवघड बाब आहे. परंतु ज्यांनी पहिल्या तासापासूनच माझे पोट भरलेले आहे आणि ज्यांना त्याची खरी गरज आहे त्याच्या पदारात जर आपण हे टाकले तर त्याचे कल्याण होवू शकते याची जाणीव झाली तर सामाजिक उत्कर्ष व्हायला वेळ लागत नाही हे तत्व अलखैर नागरी सहकारी पतसंस्था व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने राबविले आहे. या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, दै.वार्ताचे संपादक परमेश्वर गित्ते, विशाल विजयकुमार जाजू तसेच वैद्यकिय शिक्षणात यशस्वी ठरलेल्या गुणवतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वसाधारण सभेचे सुत्रसंचलन सचिव शेख रिझवान यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेख मुजाहेद सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मौलाना शेख अकबर इशाती यांच्या दुआने झाली या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष शेख रहीमभाई, फारुकी खमरूद्दीन साहेब,गटशिक्षण अधिकारी सुवर्णकार सर, शिवाजी दादा कुलकर्णी, मौलाना युसुफरजा, माजी नगरसेवक वाजेद खतीब, मेहंदी पठाण, जेष्ठ पत्रकार दिनकर जोशी, पत्रकार सय्यद नयुम, आरेफ सिद्दीकी, राजू धनराज मोरे, शाम गायकवाड, दादासाहेब कसबे जालना येथून अफसर बेग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सभासद, हितचिंतक, स्नेहीजण, महिलाभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Post Views: 235
error: Content is protected !!