कलबुर्गी–लातूर रेल्वे मार्गाचा अंबाजोगाई पर्यंत विस्तार करण्याच्या मागणी सह घाटनांदूर-श्रीगोंदा-दौंड व अन्य नवीन रेल्वे प्रस्तावांचा अनुकूल पणे विचार करण्याची आमदार नमिता मुंदडा यांची मागणी
कलबुर्गी–लातूर रेल्वे मार्गाचा अंबाजोगाई पर्यंत विस्तार करण्याच्या मागणी सह घाटनांदूर-श्रीगोंदा-दौंड व अन्य नवीन रेल्वे प्रस्तावांचा अनुकूल पणे विचार करण्याची आमदार नमिता मुंदडा यांची मागणी
रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांना पाठवले निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई आणि आजूबाजूच्या प्रवाशासाठी कलबुर्गी–लातूर रेल्वे मार्गाचा अंबाजोगाई पर्यंत विस्तार करण्याच्या मागणी सह घाटनांदूर-श्रीगोंदा-दौंड या सह अन्य रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या उद्देशाने नवीन रेल्वे प्रस्तावांचा अनुकूल पणे विचार करावा अशी मागणी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी एका निवेदना द्वारे रेल्वे मंत्री श्री
अश्विनी वैष्णव यांच्या कडे केली आहे.
मागील 30 वर्षां पासून मागणी होत असलेल्या घाटनांदूर-श्रीगोंदा-दौंड रेल्वे मार्गासाठी अखेर लोकप्रतिनिधी म्हणून केज विधानसभा मतदार संघांच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी हा प्रश्न एरणीवर घेतला आहे.
महाराष्ट्रात सुमारे ७,१७९ किलोमीटर नवीन रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणासह २८ नवीन रेल्वे लाईन, दुहेरीकरण व क्षमता-वृद्धी प्रकल्पांना केंद्र व राज्य शासनाची मान्यता मिळालेली आसल्याने श्री अश्विनी वैष्णवजी रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात आमदार नमिता मुंदडा यांनी म्हटले आहे की अंबाजोगाई व पंचक्रोशीतील प्रवाशांसाठी नवीन रेल्वे कॉरिडॉरची जनागृह अंबाजोगाई रेल्वे विकास समिती व नागरिकांकडून जोरदार मागणी आसुन त्याला धोरणात्मक, आर्थिक आणि सामाजिक महत्त्व आहे.
या निवेदना मध्ये त्यांनी
अंबाजोगाई हे ऐतिहासिक, अध्यात्मिक आणि शैक्षणिक केंद्र असल्याने, असुरक्षित रस्त्यावरील प्रवास कमी करण्यासाठी, पर्यटनाला पाठिंबा देण्यासाठी, मालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि लाखो नागरिकांना लाभ देण्यासाठी तातडीने रेल्वे मार्गाची आवश्यकता असल्याचे गांभीर्य नमूद केले असून यात प्रामुख्याने घाटनांदूर अंबाजोगाई कैज नेकनूर मांजरसुंबा पाटोदा आष्टी जामखेड-कर्जत – श्रीगोंदा (दौंड) – हा रेल्वे मार्ग ज्याचे की या पूर्वी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे
दुसरा रेल्वे मार्गदर्शन सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद लातूर अंबाजोगाई परळी सोनपेठ पाथरी -मानवत पाचलेगाव जिंतूर औंढा नागनाथ नरसी हिंगोली याचे अर्धवट सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे आणि परळी-अंबाजोगाई-कळंब-येरमाळा-बा र्शी-पंढरपूर या तीन रेल्वे मार्गाची मागणी केलेली असून हे रेल्वे मार्ग कार्यान्वित झाल्यास असंख्य आध्यात्मिक स्थळे, कृषी पट्टे आणि चाकूर, बिदर, लातूर, अहमदनगर, पुणे आणि मुंबईसह महत्त्वाची संरक्षण ठिकाणे जोडल्या जातील.
या निवेदनात त्यांनी घाटनांदूर रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, उत्तम रस्ता प्रवेश आणि सुधारित सुरक्षा उपायांची आवश्यकता आसल्याचे नमूद करत
पुणे आणि मुंबईकडे जाण्यासाठी वाढलेली ट्रेन फ्रिक्वेन्सी, विशेषत: नांदेड-परभणी-परळी-लातूर येथून रात्रीची सेवा देखील आवश्यक आहे. परळी आणि लातूर ते विदर्भ आणि उत्तर भारताशी कनेक्टिव्हिटी मजबूत केल्याने प्रादेशिक गतिशीलतेला आणखी चालना मिळणार असल्याचे म्हंटले आहे.
या सर्व रेल्वे प्रस्तावांचा आपण अनुकूल पणे विचार करावा अशी विनंती आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी या निवेदना द्वारे रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या कडे केली आहे.
*कलबुर्गी–लातूर रेल्वे मार्गाचा अंबाजोगाईपर्यंत विस्तार करण्याची मागणी*

या शिवाय त्यांनी अन्य एका निवेदनाद्वारे कलबुर्गी–लातूर प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गाचा अंबाजोगाईपर्यंत विस्तार करण्याचीही आग्रही मागणी केली आहे.
कलबुर्गी ते लातूर सुमारे १३९ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा अंबाजोगाईपर्यंत सुमारे ५० किलोमीटरने विस्तार केल्यास एकूण मार्ग १९० किलोमीटरचा होईल. त्यामुळे अंबाजोगाई–लातूर–औसा–उमरगा–कलबु र्गी असा थेट रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे.
अंबाजोगाई हे धार्मिक, सांस्कृतिक व आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र असल्याने या विस्तारामुळे पर्यटन, व्यापार, उद्योग, कृषी उत्पादनांची वाहतूक तसेच रोजगार व शिक्षणाच्या संधींना मोठा लाभ होणार आहे. मराठवाडा आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागांचा सर्वांगीण विकास वेगाने होण्यासही या रेल्वे मार्गाची महत्त्वाची भूमिका राहील, असे आ नमिता मुंदडा यांनी निवेदनात नमूद करत या मागणीला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Post Views: 632


