Thursday, January 15, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

बारामतीतील तरुणीवर अंबाजोगाईत सामूहिक अत्याचार; ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने बारामती पोलीसात महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल

बारामतीतील तरुणीवर अंबाजोगाईत सामूहिक अत्याचार; ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने बारामती पोलीसात महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई  (प्रतिनिधी) : 
      अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बलात्काराची घटना होऊन ही पिडीतेने बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने ग्रामीण पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांच्या उदासीन कार्यपद्धती विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
      याविषयी प्राप्त माहिती अशी की 
बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील राहिवासी असलेल्या एका महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेची मुलगी नृत्य आणि गायनाची आवड जोपासत होती. २४ एप्रिल २०२५ रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने फिर्यादीशी संपर्क साधला. आपल्या अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना या ठिकाणी असलेल्या पायल  कलाकेंद्रात नृत्यासाठी मुलींची गरज असून, मुलीला पाठवल्यास ती नृत्यही शिकेल आणि तिला पैसेही मिळतील, असे आमिष  दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने मुलीला पाठवण्याची तयारी दर्शवली, मात्र मुलीला अंबाजोगाई येथील ‘पायल कलाकेंद्र’ येथे नेले असता तिने तिथे राहण्यास नकार दिला. त्यानंतर बदामबाई आणि इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली.
     या मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील ‘साई लॉज’वर नेण्यात आले. तेथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या ताब्यात दिले आणि ती निघून गेली. लॉजवर उपस्थित असलेल्या मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार करून तिचे अमानुष हाल केले. त्यानंतर तिला पुन्हा गाडीतून पायल कला केंद्र येथे आणून सोडण्यात आले आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.
    अत्याचारानंतर पीडितेने मोठ्या शीताफिने आपल्या आईशी मोबाईल वर संपर्क साधून घडलेला भयंकर प्रकार सांगितला. घाबरलेल्या आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला परत बारामतीला आणले. 
    यानंतर पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिथून हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकातील एपीआय जाधवर करत आहेत.
अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास उदासीनता का?
    नृत्याची आवड असलेल्या बारामती तालुक्यातील एका मुलीला कलाकेंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पिढी तेने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले मात्र पिडीतेला अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन मधून न्याय न मिळाल्यामुळे याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती पोलीस ठाण्यात धाव घेतल्या नंतर याप्रकरणी एका महिलेसह चार जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
    अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी बलात्कारा सारख्या गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष करत गुन्हा नोंदवून न घेण्याचा उद्देश नेमका संशयास्पद असून पीडित मुलीच्या आईनेही एवढ्या उशिराने बारामती पोलीस ठाणे गाठून तक्रार देऊन न्याय मागितल्याने  याबद्दल उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आसुन अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही यासंदर्भात विचारना करण्यासाठी पोलीस निरीक्षक महोदयाशी भ्रमनध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
     या घटनेने बारामतीसह बीड जिल्हा हादरला असून, कलाकेंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या या काळ्या धंद्याचा या माध्यमातून पर्दा फाश झालेला आहे असेच म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!