जवळगाव – बर्दापूर रोडवर 25 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह परिसरात खळबळ हत्या की आत्महत्या शोध सुरु
जवळगाव – बर्दापूर रोडवर 25 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह परिसरात खळबळ हत्या की आत्महत्या शोध सुरु

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव – बर्दापूर रोडवर 25 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह मिळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली असून मृतदेहाची ओळख न पटल्याने ही हत्या आहे की आत्महत्या या निकषा पर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचलेली नाही.
याविषयी प्राप्त माहिती अशी की गुरुवारी सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव ते बर्दापूर या रोडवर रोडच्या बाजूस असलेल्या एका शेतामध्ये पंचवीस वर्षाच्या युवकाचा मृतदेह मिळून आल्यानंतर याची खबर बर्दापूर पोलिसांना समजतात बर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे व त्यांच्या पथकाने घटना स्थळी धाव घेतली.
या मृतदेहाची पाहणी केली असता त्याचे वय अंदाजे 25 असून त्याच्या अंगामध्ये पॅन्ट व तोंडाला रूमला आहे. त्याच्या हातावरती स्वप्निल असे नाव गोंदल्या गेले असून पोलिसांच्या मते या मृतदेहावर कुठल्याही गंभीर जखमांच्या खुणा नसून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगणे तूर्त तरी कठीण आहे.
सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ठेवण्यात आलेला आसून यां संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास बर्दापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी केले आहे.
Post Views: 781


