अंबाजोगाई नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी नंदकिशोर जी मुंदडा विजयी प्रचाराचे ब्रँड अँबेसिटर अक्षय मुंदडा ठरले विजयाचे शिल्पकार विजयी नगरसेवकात 20 जागा मोदी गटाला तर 11 जागा मुंदडा गटाला
अंबाजोगाई नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी नंदकिशोर जी मुंदडा विजयी प्रचाराचे ब्रँड अँबेसिटर अक्षय मुंदडा ठरले विजयाचे शिल्पकार
विजयी नगरसेवकात 20 जागा मोदी गटाला तर 11 जागा मुंदडा गटाला
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे नंदकिशोर जी मुंदडा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी लोकविकास महाआघाडीचे उमेदवार राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचा 2497 मतांनी पराभव केला असून नगर परिषदेमध्ये राजकिशोर मोदी यांच्या गटाची वीस तर मुंदडा गटाचे 11 नगरसेवक विजयी झाले आहेत.
अंबाजोगाई नगर अध्यक्ष पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला. माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि नंदकिशोर मुंदडा यांच्या मध्ये ही सरळ निवडणूक झाली. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर सुरुवातीपासूनच नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच झाल्याची तर मोदी गटाचे सर्वाधिक नगरसेवक विजय होतील असा कयास बांधला जात होता आणि अखेर तसेच होऊन ही रस्सीखेच नंदकिशोर ची मुंदडा यांनी जिंकली आणि राजकिशोर मोदी गटाचे 20 नगरसेवक विजय झाले
नगराध्यक्ष पदाच्या सुरु झालेल्या मतमोजणीत पहिल्या राऊंडमध्येच नंदकिशोर मुंदडा यांनी २०० मतांची आघाडी घेवून आपली घोडदौड सुरू केली आणि शेवटच्या फेरीपर्यंत ही घोडदौड कायम ठेवली. सहाव्या फेरी अखेर 2497
मतांची आघाडी घेवून नंदकिशोर मुंदडा विजयी झाले.
नंदकिशोर मुंदडा यांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सुरुवातीपासूनच आ. नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. या दोघांपैकी अक्षय मुंदडा यांनी न. प. निवडणूका जाहीर होण्यापूर्वी योगेश्वरी मंदीर परीसरातील उद्यानाच्या भुमीपुजननाच्या औपचारिक कार्यक्रमात केलेल्या भाषणात अक्षय मुंदडा यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण्याअगोदरच केलेल्या आपल्या संयमी भाषणात येणाऱ्या निवडणुकीत आ. नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली ही नगर परिषद ताब्यात दिली तरच शहराचा खरा विकास आम्हाला करता येईल हा सुरु धरला होता. पुढे हा सुरु कायम धरत अक्षय मुंदडा यांनी निवडणूक प्रचारात आघाडी मारली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अक्षय मुंदडा यांनी प्रचारात आघाडी मारली. नगर परिषदेच्या मागील काळात झालेल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पुराव्यासह चव्हाट्यावर आणली. आपल्या प्रचार भाषणात सातत्याने अक्षय मुंदडा यांनी हे मुद्दे प्रभावीपणे मतदारांसमोर मांडले. यांचा खुप मोठा परीणाम या निवडणुकीत मतदारांवर झालेला दिसतो.

विधानसभा निवडणुकीत आ. नमिता मुंदडा यांना विजयी करण्यासाठी नंदकिशोर मुंदडा यांनी आखलेल्या व्युह रचनेमुळे आ. नमिता मुंदडा यांच्या विजय झाला तर नगर परिषदे निवडणुकीत अक्षय मुंदडा यांची व्युहरचना नंदकिशोर मुंदडा यांना विजयी करण्यात कामी आली.
अक्षय मुंदडा हे गेली २० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणात काम करीत असतांना अक्षय मुंदडा यांनी मागील काही वर्षात स्वतः ला खुप डेव्हलप करुन घेतले आहे. आपल्या भाषणाचा स्तर, बोलण्यातला स्पष्ट आणि मुद्देसूद पणा या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव करणारा ठरला. अक्षय मुंदडा यांची ही डेव्हलपमेंट या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आली. या निवडणुकीत अक्षय मुंदडा यांची प्रचाराची शैली पाहता अंबाजोगाई शहर परिवर्तन जन विकास आघाडीचे ते ब्रँड अँबेसिटर ठरल्याने नंदकिशोर मुंदडा यांच्या विजयाचे शिल्पकार ख-या अर्थाने अक्षय मुंदडा हेचं ठरले असेच म्हणावे लागेल.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा हे विजयी झाले असले तरी त्यांना नगरसेवक पदाचे उमेदवार अधिक निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले नाही. राजकिशोर मोदी यांच्या गटाचे जवळपास २० तर नंदकिशोर मुंदडा यांच्या गटाचे ११ नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे नगर परिषदेचा कारभार सर्व नगर सेवकांना सांभाळून करतांना नंदकिशोर मुंदडा यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
विजयी झालेले अध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोरजी मुंदडा यांच्या समवेत नगरसेवक पदाचे जे उमेदवार विजयी झाले आहेत त्यामध्ये

प्रभाग क्रमांक 1
अ- किरण भालेकर (मुंदडा गट),
ब- शमशाद बेगम अयुब (मुंदडा गट )
प्रभाग क्र 2
अ- शेख मुस्तकीन शेख शकील (मुंदडा गट) ब – काळे मैनाबाई सदाशिव (मुंदडा गट)
प्रभाग क्रमांक 3
अ – महेश कदम (मोदी गट),
ब – शेख शिरीन अशपाक (मोदी गट )
प्रभाग क्रमांक 4
अ-लोमटे श्रुती अमोल (मोदी गट)
ब-महेश लोमटे (मोदी गट)
प्रभाग क्रमांक 5
अ – जोगदंड मालू (मोदी गट )
ब – लोमटे संगीता दाजीसाहेब (मोदी गट) प्रभाग क्रमांक 6
अ – कराड आकाश (मोदी गट)
ब -सुचिता देशपांडे (मुंदडा गट)
प्रभाग क्रमांक 7
अ – देशमुख गणेश (मुंदडा गट )
ब – काळे सोनल (मुंदडा गट)
प्रभाग क्रमांक 8
अ – गंभीरे शिल्पा (मुंदडा गट)
ब – महेश अंबाड (मुंदडा गट)
प्रभाग क्रमांक 9
अ- दिनेश भराडिया (मोदी गट)
ब- लोमटे दीपा बबन (मोदी गट)
प्रभाग क्रमांक 10
अ- रचना परदेशी (मुंदडा गट)
ब – सय्यद ताहेर अब्दुल( मोदी गट)
प्रभाग क्रमांक 11
अ- सरवदे सोनी दत्ता (मोदी गट)
ब- गवळी इस्माईल हिरु (मोदी गट)
प्रभाग क्रमांक 12
अ- शेख शमिम शेख रहीम (मोदी गट)
ब -सय्यद बशीरा शफिक (मोदी गट)
प्रभाग क्रमांक 13
अ – जावळे राजपाल (मोदी गट) विजयी
ब – पठाण नाजनीन बेगम (मोदी गट)
प्रभाग क्रमांक 14
अ- बबिता अदमाने (मुंदडा गट)
ब – पठाण नजीर उमरदराज (मोदी गट)
प्रभाग क्रमांक 15
अ – जयश्री साठे (मोदी गट )
ब – जाधव रेखा विलास (मोदी गट )
क -विकास काकडे (मोदी गट)
यांचा समावेश आहे.
Post Views: 1,194



