Thursday, January 15, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

नौकरीच्या संधी उपलब्ध करून देणारा योगेश्वरी महाविद्यालयातील कॅम्पस इंटरव्यूव* *~ विभागप्रमुख सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.प्रज्ञा किनगावकर*

*नौकरीच्या संधी उपलब्ध करून देणारा योगेश्वरी महाविद्यालयातील कॅम्पस इंटरव्यूव*

*~ विभागप्रमुख सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.प्रज्ञा किनगावकर*


======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील योगेश्वरी महाविद्यालयामध्ये किमान कौशल्यावर आधारित ऑपथँल्ममिक टेक्निशियन हा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा कॅम्पस इंटरव्यूव नुकताच महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.

ऑपथँल्ममिक टेक्निशियन या व्यावसायिक अभ्यासक्रम विभागामध्ये वेगवेगळ्या दरवर्षी नेत्रालय व हॉस्पिटल्स मधल्या टीम येऊन येथे शिकत असलेल्या बारावीच्या मुलांचा कॅम्पस इंटरव्यूव घेतात व त्यांची नेत्रालयामध्ये एक वर्षाच्या अप्रेंटिसशिपसाठी निवड करतात. म्हणजे या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच या विद्यार्थ्यांची नोकरी पक्की होते. त्या विद्यार्थ्यांना या ऑपथँल्ममिक टेक्निशियन कोर्सद्वारे महाराष्ट्रातल्या नामांकित नेत्रालय दवाखाने यामध्ये नौकरीच्या हजारो संधी उपलब्ध होतात. हा हेतू ठेवून ऑपथँल्ममिक टेक्निशियन या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विभागप्रमुख डॉ.प्रज्ञा किनगावकर गेल्या अनेक वर्षांपासून या स्वरूपाची कॅम्पस इंटरव्यूव आयोजित करीत असतात. हा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी खुल्या हव्यात म्हणून विविध नेत्रालय सेवाभावी संस्थांच्या मदतीने चालत असलेले डोळ्यांचे दवाखाने यांच्या मदतीने योगेश्वरी महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्यूव ही मोहीम राबविली जाते अशी माहिती डॉ.प्रज्ञा किनगावकर यांनी यावेळी दिली. या उपक्रमाद्वारे हा कोर्स शिकत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना आतापर्यंत नौकरीच्या संधी उपलब्ध झालेले आहेत. तसेच ऑपथँल्ममिक टेक्निशियन हा कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी चष्म्याची दुकाने सुद्धा टाकू शकतात. यावर्षी डॉ.मनोहर डोळे आय फाऊंडेशनचे सर्वेसर्वा सुरज सदानशिव व त्यांच्या नेत्रालयाच्या परीक्षक टीमने हा कॅम्पस इंटरव्यूव ठेवला होता. यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यात उस्फूर्त सहभाग नोंदवत नोकरीकरिता आपली निवड पक्की केली. या कॅम्पस इंटरव्यूवला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.कानेटकर, एमसीव्हीसीचे विभागप्रमुख यु.बी.रहकवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.एम.व्ही.कानेटकर यांनी हा कॅम्पस इंटरव्यूव विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणार आहे, उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची योग्य तयारी करून घेण्यासाठी आहे व या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये उत्तम करिअरची संधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकर चौसाळकर कोषाध्यक्ष डॉ.शैलेश वैद्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करीत असे कॅम्पस इंटरव्यूव विद्यार्थ्यांचा शिक्षणाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन वाढवतात असे मत व्यक्त केले. सुरज सदानशिव यांनी बोलताना कॅम्पस इंटरव्यूव म्हणजे व्यावसायिक प्रवासाची तयारी असते हुशार विद्यार्थ्यांमधील प्रतिभा शोधून त्यांना वाव देण्यासाठी संधी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा व बुद्धिमत्तेचा कंपनीच्या उत्कर्षासाठी उपयोग होतो. तसेच विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतात असे प्रतिपादन केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्दिकी, पांडे, पालमकर यांच्यासह सागर अप्परशिंगे, पांडुरंग टोमके, अक्षय चाटे, अनुष्का, सिमरन, संध्या यांनी परिश्रम घेतले.

=====================
=======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!