Skip to content
*फिजिशियन्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंबाजोगाई अध्यक्षपदी डॉ.नवनाथ घुगे तर सचिवपदी डॉ.राहुल धाकडे*
———————————————
*अंबाजोगाई/प्रतिनिधी*
———————————————
अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व मधुमेह तज्ज्ञ डॉ.नवनाथ घुगे यांची असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया च्या अंबाजोगाई शाखेच्या अध्यक्षपदी तर सचिवपदी छातीविकार तज्ञ डॉ.राहुल धाकडे बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे
या संदर्भात नुकतीच एक बैठक घेण्यात येऊन या बैठकीत देशपातळीवर कार्यरत असलेल्या असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातून आपल्या परिसरातील सर्व फिजिशियन्स एकत्र आले पाहिजेत आणि त्यातून सामाजिक हित जपले गेले पाहिजे यासाठी बैठक घेण्यात आली. आणि या बैठकीच्या माध्यमातून केज, धारुर, अंबाजोगाई व परिसरातील फिजिशियन्स डॉक्टर यांना सामावून घेवून हे कार्य व्यापक केले पाहिजे अशी भुमिका मांडण्यात आली. देशभरातील सर्व एम.डी.मेडिसिन, डी.एन.बी. मेडिसिन, चेस्ट फिजिशिन, मधुमेह तज्ज्ञ यांची देश पातळीवर असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या नावाची संघटना कार्यरत आहे. या बैठकीसाठी जेष्ठ फिजिशिन डॉ.एन.पी.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, शाखा अंबाजोगाईची स्थापना करुन नुतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यामध्ये अध्यक्षपदी डॉ.नवनाथ घुगे, उपाध्यक्षपदी डॉ.अनिल मस्के,व डॉ.सचिन चौधरी तर सचिवपदी प्रसिद्ध श्वसन विकार तज्ज्ञ व आय.एम.ए.अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांची निवड करण्यात आली. सहसचिव म्हणून प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ.अतुल शिंदे,कोषाध्यक्ष म्हणुन डॉ.विवेक मुळे तर सहकोषाध्यक्षपदी डॉ.इम्रान पटेल यांची निवड करण्यात आली.या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.एन.पी.देशपांडे, डॉ.शुभदा लोहिया, डॉ.संजय चव्हाण हे काम पाहणार आहेत तर सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करण्यात आले.
तसेंच प्रसिद्ध फिजिशिन डॉ.गोपाळ पाटील, डॉ.संदीप थोरात, डॉ.अविनाश मुंडे, डॉ.वासंती चव्हाण, डॉ.नागोराव डेरनासे, डॉ.शरद साबळे, प्रसिद्ध हृदय रोगतज्ज्ञ डॉ.दिपक कटारे, डॉ.शाहिद, डॉ.राहुल गुट्टे, केज येथील प्रसिद्ध वरिष्ठ फिजिशियन व जि.प, सदस्य डॉ.योगिनीताई थोरात, डॉ.अस्वले, डॉ.ब्रम्हा डोईफोडे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.डॉ.नवनाथ घुगे हे मागील 21 वर्षांपासुन शहरामध्ये घुगे हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिगंभीर रुग्णासाठी आयसीयुच्या माध्यमातून अहोरात्र सेवा करत आहेत. डॉ.नवनाथ घुगे यांचा रुग्ण सेवेसोबत अनेक सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच सहभाग असतो. त्यांनी अनेक वर्ष आय.एम.ए.च्या सचिवपदी व अध्यक्षपदी काम केले आहे. म्हणूनच त्यांची ए.पी.आय, अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, शाखा अंबाजोगाईच्या वतीने आगामी काळात डॉक्टर बांधवांसाठी वैद्यकीय क्षेत्रात होणार्या संशोधनासाठी चालना देणे, नवनवीन वैद्यकिय परिषदा आयोजित करणे व आपल्या परिसरातील रुग्ण सेवेमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च प्रतिची सेवा देणे यावर भर दिला जाणार आहे त्यासोबतच येणार्या काळामध्ये जे काही आव्हाने व समस्या असतील त्यावर मात करत एक विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प असल्याचे डॉ.नवनाथ घुगे यांनी सांगितले.
Post Views: 78
error: Content is protected !!