ताज्या घडामोडी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अंबाजोगाई येथे हिंदू संमेलनाचे आयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अंबाजोगाई येथे हिंदू संमेलनाचे आयोजन

 

 (अंबाजोगाई) 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त येथील सावता माळीनगर, हनुमान मळा, दुर्गा कॉलनी, कुलस्वामिनी कॉलनी, ज्योती नगर, श्रीकृष्ण कॉलनी, या भागातील सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू संमेलनाचे आयोजन शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता करण्यात आले असून यासाठी समाजातील हिंदू संमेलन समिती स्थापन करण्यात आली आहे
या हिंदू संमेलनाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. श्री अमोल महाराज घोडके यांची तर समिती सदस्य म्हणून प्रा. विनय राजगुरू, डाॅ.बालासाहेब मुंडे, डॉ. देविदास खोडेवाड, सतीश वांगे, सतीश बलुतकर, श्रीकांत काळे, राजेंद्र शेप, सुरेखा काळे, ज्योती शिंदे,लक्ष्मी घुगे, अनुजा गुडे, अरुण पत्की, डॉ रोहिणी अंकुश, डॉ. मनीषा रोकडे, अनिल राठोड आदींची निवड करण्यात आली आहे. हे हिंदू संमेलन सावता माळी नगरातील स्वयंवर मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केले आहे.

१४मार्च २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४:०० वाजता हिंदू संमेलनाची बालगोपालांच्या दिंडीने सुरुवात होईल. तरी सर्व हिंदू जनजागृतीसाठी सदर स्वामी समर्थ वस्तीतील व उपरोक्त उल्लेख केलेल्या वसाहतीमधील सर्व महिला, स्वयंसेवक, कार्यकर्ते, बंधू-भगिनी यांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संमेलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या हिंदू संमेलनांचे आयोजन शहरातील इतर वस्तीच्या माध्यमातून देखील करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!