Skip to content
*योगेश्वरी पॉलिटेक्निकमध्ये करिअर मार्गदर्शनासाठी विशेष सेमिनार*

अंबाजोगाई :- योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित, कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक, अंबाजोगाई येथे विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी “Roadmap After Polytechnic: Higher Education & Career Options” या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. उल्हास मालवडे (Assistant Director – Student Affairs, MIT-ADT University, पुणे) उपस्थित होते. त्यांनी पॉलिटेक्निक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः डिग्री इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया, उच्च शिक्षणाच्या संधी, उद्योग क्षेत्रातील नोकरीच्या संधी तसेच उद्योजकतेच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.
तसेच दुसरे तज्ज्ञ वक्ते म्हणून प्रा. अमित उत्तरकर यांनी विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया, योग्य शाखा निवड व करिअर नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात Artificial Intelligence, Data Science, Robotics यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये कौशल्य विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी योग्य करिअर नियोजन करून उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या मार्गदर्शनपर सेमिनारसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकनंतरच्या विविध शिक्षण व करिअर संधींबाबत महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. शाम गडदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऑटोमोबाईल विभाग प्रमुख प्रा. बप्पासाहेब सोनवणे यांनी केले.
Post Views: 35
error: Content is protected !!