तलाठी गणेश कोळी आत्महत्या प्रकरणी पत्नी दिपाली कोळी यांच्याविरुद्ध अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल, पत्नीच्याच डायरीने केली उकल
तलाठी गणेश कोळी आत्महत्या प्रकरणी पत्नी दिपाली कोळी यांच्याविरुद्ध अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल, पत्नीच्याच डायरीने केली उकल

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बारा दिवसापूर्वी विवाहबद्ध झालेल्या आणि व्यवसायाने तलाठी असलेल्या गणेश दत्तू कोळी याने 25 मे रोजी दुपारी अंबाजोगाई शहरा नजिक असलेल्या मोरेवाडी परिसरात तो राहत असलेल्या ज्योतीराम दळवे यांच्या घरातील रूममध्ये गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आल्या नंतर या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांत पत्नी दिपाली धनंजय कोळी हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याविषयी प्राप्त माहिती अशी की औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील रहिवासी असलेल्या आणि चंद्रपूर महसूल विभागात तलाठी या पदावर कार्यरत असलेल्या गणेश दत्तू कोळी याचा बीड येथील राहिवासी असलेल्या व सध्या अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संलग्न असलेल्या फॉरेन्सिक डिपारमेंट मध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या दिपाली हिच्या सोबत घटनेच्या 12 दिवसा पूर्वी म्हणजे 13 मे 2026 रोजी बीड या ठिकाणी विवाह झाला होता.
गणेश व दिपाली कोळी यांनी राहण्या साठी अंबाजोगाई शहरा नजीक असलेल्या मोरेवाडी परिसरातील रहिवाशी ज्योतीराम दळवे यांच्याकडे स्लॅबची रूम भाड्याने घेतली होती. दिपाली व गणेश यांच्या विवाहास केवळ 12 दिवस लोटले असताना या 12 दिवसात असं काय घडलं कोण जाने त्यांच्या नव्याने फुलू लागलेल्या संसारास दृष्ट लागली आणि गणेश याने 25 मे सोमवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास पत्नी ड्युटीवर गेलेली असताना व रूममध्ये कोणीही नसताना यांनी स्लॅबला असलेल्या लोखंडी हुकला दोर लावून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
याप्रकरणी सर्वप्रथम अंबाजोगाई पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाल्या नंतर काल गुरुवारी सायंकाळी मयत गणेश कोळी यांचे
यांच्या फिर्यादी वरून पत्नी दीपाली कोळी हिच्या विरुद्ध मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
अंबाजोगाई पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अशी माहिती प्राप्त झालेली आहे की मयत गणेश व दीपाली यांचा विवाह झाल्यापासून दोघांमध्ये बेबनाव सुरू झाला, लग्नविधी पार पडल्यानंतर देव देवाला जात असतानाच दिपाली कोणासोबत तरी मोबाईल वरून गुपचूप बोलत असे, त्यानंतर सुहागरातीच्या दिवशी शरीर संबंधासाठी पतीला कुठलाही प्रतिसाद न देता ती दुसरे दिवशी सरळ अंबाजोगाईला निघून आली.
घटनेपूर्वी गणेश दिपालीच्या पाठोपाठ अंबाजोगाई मध्ये आला यावेळी गणेशला घरामध्ये एक धायरी मिळून आली या डायरीमध्ये दिपालीने एका प्रिय करा संदर्भात काहीतरी लिहून ठेवल्याचे व त्यावरूनच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे वृय असून त्यानंतर ती बाहेर गेली आणि गणेश याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
आत्महत्या करण्यापूर्वी गणेश याने आपल्या बहिणीला कॉल करून संबंधित डायरीविषयी बोलून कल्पना ही दिली होती.,पोलिसांनी काढलेल्या सीरिअरमध्येही बहिण भावाचा संवाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे
याप्रकरणी मयत गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी हिच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मधे
गुन्हा रजिस्टर नंबर 220/ 26 कलम 108 भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री वशिष्ठ कागणे हे करीत आहेत आरोपी अटक नसुन आरोपीचा शोध चालू आहे


