Skip to content
हरवलेले १५ मोबाईल अंबाजोगाई शहर पोलिसांकडून मूळ मालकांना परत

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याने तांत्रिक तपास व सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या माध्यमातून हरवलेले १५ मोबाईल फोन शोधून काढत संबंधित मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस अंमलदार रविकुमार केंद्रे यांनी तांत्रिक तपास व समन्वयातून महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसेच स्क्रीन लॉक, मजबूत पासवर्ड व इतर सुरक्षा सुविधांचा वापर करावा, असे आवाहन केले.
हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी अंबाजोगाई शहर पोलिसांचे आभार मानले.
Post Views: 767
error: Content is protected !!