ताज्या घडामोडी

पदवी माणसाला सामाजिक जाणीव निर्माण करते – प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ

पदवी माणसाला सामाजिक जाणीव निर्माण करते – प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ

अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील वसुंधरा महाविद्यालयात अंतर्गत पदवी वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कामधेनू सेवाभावी संस्थेचे कोषाध्यक्ष बाबासाहेब देशमुख अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अब्दुल समद, प्रभारी प्राचार्य डॉ. अर्जुन मोरे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. अमोल गगणे, प्रा. डॉ. जगन्नाथ तुडमे व प्रा. डॉ. साहेबराव दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ म्हणाले, “पदवी ही केवळ कागदाचा तुकडा नसून ती व्यक्तीला समाजात वेगळे स्थान मिळवून देते. पदवीधरांनी सामाजिक जाणीव ठेवून देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे.” त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाचाही उलगडा केला.
प्रभारी प्राचार्य डॉ. अर्जुन मोरे यांनी अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाच्या इतिहास व प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमात बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. पदवीधारक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अमोल गगणे यांनी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. जगन्नाथ तुडमे यांनी तर आभार प्रा. डॉ. साहेबराव दीक्षित यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!