Wednesday, February 4, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

अंबाजोगाईत दक्षिण मराठवाडा स्तरीय महिला मेळावा संपन्न; ‘ज्येष्ठ महिलांनी अन्यायाविरुद्ध संघटित व्हावे’ – मायाताई कुलकर्णी

अंबाजोगाईत दक्षिण मराठवाडा स्तरीय महिला मेळावा संपन्न; ‘ज्येष्ठ महिलांनी अन्यायाविरुद्ध संघटित व्हावे’ – मायाताई कुलकर्णी

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील श्री योगेश्वरी ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या वतीने दक्षिण मराठवाडा स्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या मेळाव्यात महिलांचे संघटन, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि सामाजिक प्रबोधन यावर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे दक्षिण मराठवाडा अध्यक्ष डॉ. डी.एच. थोरात यांनी संघटनेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. आपली एकजूट हीच आपली मोठी ताकद असून, त्या माध्यमातून आपण आपले न्याय्य हक्क मिळवू शकतो.” त्याच बरोबर अध्यक्षीय भाषणात ॲड. अनंतराव जगतकर यांनी आजपर्यंत कश्या प्रकारे काम करण्यात येते यावर प्रकाश टाकला तसेच उपस्थितांचे आभार मानले.
फेस्कॉमच्या (ज्येष्ठ नागरिक महासंघ) मराठवाडा महिला प्रमुख मायाताई कुलकर्णी यांनी यावेळी महिलांना विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “१२ डिसेंबर १९८० रोजी फेस्कॉमची स्थापना झाली, तेव्हापासून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशनं घेतली जातात. समाजात आजही अनेक ठिकाणी ज्येष्ठ महिलांना घरांतून, विशेषतः सुनांकडून त्रास दिला जातो. अशा वेळी संघटनेतील इतर महिलांनी पीडित महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.”

कुलकर्णी यांनी पुढे नमूद केले की, ज्येष्ठ नागरिकांमध्ये महिलांचे प्रमाण ५३ टक्के असून पुरुषांचे ४७ टक्के आहे. आपण अंधश्रद्धेला खतपाणी न घालता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा. खरी श्रीमंती ही पैसे साठवण्यात नसून ती गरजूंसाठी खर्च करण्यात आहे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. या सोहळ्याला डॉ. डी.एच. थोरात (अध्यक्ष, दक्षिण मराठवाडा), ॲड. अनंतराव जगतकर (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाई), डॉ. मायाताई कुलकर्णी (मराठवाडा महिला प्रमुख, फेस्कॉम), प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नयना सिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सूत्रसंचालन पुष्पा बगाडे तर आभार इंदू पल्लेवार यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!