साखर कारखाना रोडवरील जुगार अड्डयावर आंबजोगाई पोलिसांचा छापा, पावणे पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
साखर कारखाना रोडवरील जुगार अड्डयावर आंबजोगाई पोलिसांचा छापा, पावणे पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शहरातील कारखाना रोड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 4 लाख 73 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, जान्हवी हॉटेल परिसर, कारखाना रोड येथे काही जण पत्त्यांवर पैसे लावून “तिर्रट” नावाचा जुगार खेळत आहेत.
या माहितीनुसार पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक शरद जोंगदंड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि आनंद शिंदे, पोलीस कर्मचारी पांडुरंग काळे, हनुमंत चादर, प्रविणकुमार गित्ते, सुशांत गायकवाड व भागवत नागरगोजे या पथकाने छापा टाकला असता सहा आरोपी गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद खतीब (वय 50), सद्दाम बागवान (वय 30), शेख अजहर जिलानी (वय 48), श्रीराम बारगजे (वय 39), नागनाथ ढगे (वय 22) व धर्मराज वाघमारे (वय 39) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून 11,670 रुपये रोख, 1 लाख 37 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि 3 लाख 25 हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली असा एकूण 4,73,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 125/2026, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आसुन पुढील तपास पोलीस हवालदार विजयसिंग गायकवाड करीत आहेत



