Skip to content
लोखंडी सावरगाव येथे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व बालविवाह मुक्त भारत योजनेची जनजागृती

अंबाजोगाई (प्रतिनिधी )
ग्रामीण विकास मंडळ बनसारोळा संचलित सखी निवासच्या वतीने लोखंडी सावरगाव येथे जिल्हा परिषद शाळा लोखंडी सावरगाव व जय भवानी विद्यालय लोखंडी सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व बालविवाह मुक्त भारत योजनेसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे सर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये सय्यद सर (अध्यक्ष, ग्रामीण विकास मंडळ), सौ. शितल देशमुख (सरपंच, लोखंडी सावरगाव), श्री नारायण पवार (ग्रामविकास अधिकारी), श्री एम एस मोरे (मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा), शेख अर्शिया मॅडम (वन स्टॉप सेंटर – समुपदेशिका), राम विष्णू शेळके (मुख्याध्यापक, जय भवानी विद्यालय), कल्पना पुरी (मॅनेजर, सखी निवास), काजल मुंडे (वॉर्डन, सखी निवास) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सखी निवास मॅनेजर, कल्पना पुरी यांनी उपस्थितांना स्वागत केले आणि योजनेची महत्त्वाची माहिती दिली.
त्यानंतर, बालविवाह रोखण्यासाठी व मातृवंदना योजनांच्या फायदे व उद्दिष्टे यावर मार्गदर्शन करण्यात आले. शेख अर्शिया मॅडम यांनी मातृवंदना व वन स्टॉप सेंटरच्या उपयुक्ततेची माहिती दिली आणि उपस्थितांनाही बालविवाह रोखण्यासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले.

विशेषत: आशा वर्कर बागल यांनी मातृवंदना योजनेची माहिती दिली, तर नाईकवाडे सर यांनी बालविवाहासंबंधी महत्त्वपूर्ण विचार मांडले आणि उपस्थितांना बालविवाह रोखण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन केले.
ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष सय्यद सर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सखी निवास केंद्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना असून, संस्थेने महिलांना विविध योजनांचा लाभ दिला आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी, सौ. बनसोडे आशा यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
ग्रामीण विकास मंडळाने केंद्रपुरस्कृत मिशन शक्ती योजनेसाठी जनजागृती मोहिमेला लोखंडी सावरगावापासून प्रारंभ केला. यामध्ये मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळ व बचत गटाच्या सदस्यांचा सहभाग होता.
Post Views: 74
error: Content is protected !!