वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक, टॉवरवर चढले, टायर पेटवले
परळीमध्ये वाल्मीक कराड यांच्या समर्थकांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झालेय. वाल्मीक कराड याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत समर्थक आक्रमक झाले.
वाल्मीक कराड यांच्या आईने आज सकाळपासून परळी स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर परळीमध्ये कराड समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत टॉवरवर चढून आंदोलन केले. एकीकडे वाल्मीक कराडला घेऊन सीआयडी न्यायालयात गेली असतानाच दुसरीकडे परळीमध्ये नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
परळीमध्ये कराड समर्थकांनी टॉवरवर चढत आंदोलन केले. आक्रमक झालेल्या समर्थकांनी टायरही पेटवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टायर विझवले,