Friday, November 13, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

“मधुमेहावरनियंत्रण,आरोग्यपूर्ण जीवनाचे संरक्षण”*

*“मधुमेहावरनियंत्रण,आरोग्यपूर्ण जीवनाचे संरक्षण”*

दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी जगभरात जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) साजरा केला जातो. हा दिवस डॉ. फ्रेडरिक बैटिंग यांच्या जन्मदिनानिमित साजरा केला जातो. ज्यांनी इन्सुलिनचा शोध लावून जगभरातील कोट्यावधी लोकांचे प्राण वाचवले.

मधुमेह म्हणजे काय हे सर्वांना माहीत असले तरी त्याचा गंभीर परिणाम अजूनही लोकांना समजलेला नाही. त्यामुळे या दिवसाचे मुख्य उद्धीष्ट लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, आहे लवकर निदान आणी योग्य नियंत्रण.

मधुमेह हा शरीरातील इन्सुलिन या हार्मोनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. इन्सुलिन हे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. जेव्हा इन्सुलिन नीट कार्य करत नाही, तेव्हा रक्तातील साखर वाढते आणि त्यामुळे शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम होतो.

मधुमेहाचे तीन मुख्य प्रकार आहेत
Type – 1 मधुमेह=हा प्रकार बालपणी किंवा तरुण वयात होतो, जेव्हा शरीरात इन्सुलिन तयारच होत नाही.

Type – 2 मधुमेह= हा सर्वसाधारण प्रकार असून चुकीचा आहार जाडी, ताणतणाव, निष्क्रीय जीवनशैली यांमुळे होतो.

गर्भधारणे दरम्यान = असा मधुमेह जो गर्भवस्थेदरम्या प्रथमच आढळतो आज भारताला जगभरात “मधुमेहाची राजधानी “म्हटले जाते. भारतामध्ये जेवढी काही मधुमेही लोक आहेत न्याहून अधिक लोक प्रि – डायबेटिक म्हणजेच धोक्याच्या टप्यावर आहेत.आजकाल अनेक लोक बसून काम करतात, कमी व्यायाम करतात जंक फुड आणि गोड पदार्थ जास्त खातात या सवयीमुळे शरीरात इन्सुलिन नीट कार्य करत नाही आणि मधुमेह होतो.
भारतीय लोकांमध्ये नैसर्गिक रित्या

इन्सुलिन प्रतिकार (Insulin resistance) जास्त दिसून येतो.त्यामुळे इतर देशांच्या लोकांपेक्षा आपल्याला मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. शहरांमधील ताण झोपेचा अभाव आणि असंतुलित जीवनशैली हेही कारणे आहेत. भारतात अनेक लोकांना आपल्याला मधुमेह आहे हेब माहीत नसते. त्यामुळे आजार वाढेपर्यंत उपचार सुरू होत नाहीत.

मधुमेहाबद्दल जागरुकता ठेवणे अत्यंत, महत्त्वाचे आहे. जागरुकता वाढल्याने लोक नियमित तपासणी करतात व मधुमेहाचे लवकर निदान करू शकतात. टाइप 2 मधुमेह योग्य जीवनशैली ठेवून टाळता किंवा उशिरा येऊ शकतो. जागरुकता लोकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य वजन राखणे याबद्दल माहिती देते. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी जागरूकतेमुळे ब्लड शुगर,रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवल्यामुळे भविष्यातील होणारे मधुमेहाचे गंभीर परिणाम टाळता येतात. परिणामी आरोग्यखर्च कमी होईल आणि समाज अधिक निरोगी बनेल.

हया सर्व कारणामुळे मधुमेहाविषयी जागरूकता म्हणजे आरोग्याकडे जाणारे पहिले पाऊल’ असे म्हणता येईल.
दर मिनिटाला नवीन रुग्ण ओळखला जातो आणि दर मिनिटाला कुणाचा तरी अवयव या आजाराम प्रभावित होतो.

मधुमेह हा फक्त साखरेचा आजार “नाही.तो हळूहळू शरीरातील अनेक अवयवांचे नुकसान करतो. जसे की डोळ्यांची दृष्टी कमी होणे किंवा अंधत्व येणे, मुत्रपिंड निकामी होणे, हृदयरोग, हार्ट अटॅक पायांच्या नसा व रक्तपुरवठा कमी होऊन पाय कापावा लागण्याची वेळ येते.

संशोधन सांगते की, जर HbA1C (साखरेचा दीर्घकालीन मापक) फक्त 1% ने कमी केला तर डोळे, किडनी आणि हृदयावरील धोका मोठ्या प्रमाणात कमी केला जातो.

*मधुमेह टाळता आणि नियंत्रित करता येतो, फक्त थोडे शिस्तबद्ध जीवन हवे.

संतुलित आहार घ्या,जास्त साखर, पांढरा भात, मैदा, तेलकट तळलेले पदार्थ टाळा.

दररोज व्यायाम करा किमान 30 मिनिटे चालणे योगा किंवा सायकलिंग

नियमित तपासणी करा उपाशी व जेवनानंतरची साखर,

HbA1c दर 3-6 महिन्यांनी तपासा.
ताणतणाव कमी ठेवा ध्यान, प्राणायम छंद यांचा वापर करा

मद्यपान व धुम्रपान टाळा हे साखरेवर, आणि हृदयावर-वाईट परिणाम करतात.

औषधे वेळेवर घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे थांबवू नका. या वर्षीच्या जागतिक मधुमेह दिनाचा संदेश आहे ” मधुमेहावर नियंत्रण आरोग्यपूर्ण जीवनाचे संरक्षण” हे फक्त घोषवाक्य नाही तर आपल्या जीवनशैलीचा संकल्प आहे.

आपण स्वतः सजग झालो तर आपल्या कुटुंबाला,समाजाला आणि देशाला या आजारापसून वाचवू शकतो.

चला या दिवशी आपण सगळ्यांनी. एक निश्चय करूया

दररोज आरोग्याकडे लक्ष देऊ

साखरेवर नियंत्रण ठेवू

आणि मधुमेहमुक्त भारत घडवू.”

**डॉ. अतुल शिंदे*
*मधुमेहतज्ञ*
*संचालक योगेश्वरी डायबिटिस केअर सेंटर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!