Friday, November 13, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबाजोगाईच्या शेतकरी व कष्टकऱ्यांची दिवाळी केली गोड*

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबाजोगाईच्या शेतकरी व कष्टकऱ्यांची दिवाळी केली गोड*

*एक हजार शेतकऱ्यांना शिधा वाटप ~ तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांची माहिती*


====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्यात दुष्काळ आणि आर्थिक अडचणींमुळे राज्य सरकारने यंदा दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ वाटप न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने स्वतःच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील १ हजार दुष्काळग्रस्त शेतकरी, कष्टकरी आणि गरजू कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप केले असल्याची माहिती तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांनी दिली आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांनी सांगितले की, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेनेचे महाराष्ट्र सचिव संजय मोरे, बीड जिल्हा संपर्कमंत्री ना.भरतशेठ गोगावले, बीड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या प्रेरणेतून व उपनेत्या माजी आमदार प्रा.संगिताताई ठोंबरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख राजेभाऊ लोमटे, तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, शहरप्रमुख गणेश जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख सुजित शिंदे (केज विधानसभा), युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश लोमटे (परळी विधानसभा) यांच्यासह शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी रवी मुडेगावकर, दादासाहेब देशमुख, गणेश देवकते, शिवलिंग यादव, दशरथ चाटे, कल्याण पवार, महादेव चाटे, हरीभाऊ चाटे, महेश देशमुख, समिरण मसलकर, अमर माने, महिला तालुकाध्यक्ष सुनिता जाधव, मिराबाई आडे, जयश्री पिंपरे, खंडू पालकर, सतिश फुगनर, हनुमंत हावळे यांच्यासह शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक व महिला आघाडी, तालुक्यातील सर्व बीएलओ यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबाजोगाई तालुक्यातील विविध गावांमध्ये १ हजार दुष्काळग्रस्त शेतकरी, कष्टकरी आणि गरजू कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप करण्यात आले. अशीच मोहीम शिवसेनेच्या वतीने राज्यभरातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये आणि गावांमध्ये दिवाळीनिमित्त मोफत ‘आनंदाचा शिधा’ (किंवा फराळ व शिधा किट) वाटप करण्यात आले. या किटमध्ये प्रामुख्याने हरभरा दाळीचे पीठ, साखर, रवा, मैदा, पोहे व तेल हे सणासुदीला लागणारे आवश्यक साहित्य समाविष्ट आहे, ज्यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकरी आणि गरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना कठीण काळात आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला गेला आहे. अशी माहिती तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांनी दिली.
====================

====================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!