अंबाजोगाई वकील संघाच्या अध्यक्ष पदी अॅड. अजित लोमटे यांची तर सचिव पदी ऍड रविकांत सापते यांची निवड
अंबाजोगाई वकील संघाच्या अध्यक्ष पदी अॅड. अजित लोमटे यांची तर सचिव पदी ऍड रविकांत सापते यांची निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई वकील संघाच्या अध्यक्ष पदी अॅड. अजित राजेसाहेब लोमटे यांची तर सचिव पदी ऍड रविकांत सापते यांची निवड झाली असून या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी सण 2025-26 साला साठी अंबाजोगाई वकील संघाची निवडणूक अत्यंत खेळी मेळीच्या स्वरूपात
पार पडली या निवडणुकीत ऍड अजित लोमटे व ऍड सतीश काळम यांच्या नेतृत्वा खाली स्वतंत्र पॅनल उभा होते.
या निवडणुकी मध्ये अध्यक्ष पदासाठी
अॅड. अजित राजेसाहेब लोमटे यांची निवड करण्यात आली असून त्यांना 262 मते तर प्रतिस्पर्धी अॅड. सतिष दामोधरराव काळम यांना 89 मते पडली.
उपाध्यक्ष पदा साठी ऍड काळम गटाचे
अॅड. दिलीप रखमाजी गोरे हे विजयी झाले असून यांना 163 मते तर प्रतिस्पर्धी अॅड. महादेव ज्ञानोबा मुदगलकर 70 तर अॅड. भागवत गंगाधर केंद्रे यांना 120 मते पडली.
सचिव पदासाठी अॅड. पंकज दिलीपराव खांडेकर यांना 151 तर प्रतिस्पर्धी अॅड. रविकांत शिवाजी सापते यांना 199 मते पडली. सहसचिव पदा साठी अॅड. बालाजी बाबासाहेब किंर्दत यांना 161 तर प्रतिस्पर्धी अॅड. बळीराम अंगद पुरी यांना 191 मते पडली. ग्रंथपाल पदासाठी अॅड. छाया शेषेराव देहरे यांना
141 तर प्रतिस्पर्धी अॅड. सय्यद शोयब अफसर यांना 211 मते पडली.
अॅड.आर.आर नर्मळे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले तर त्यांना सिद्धेश्वर स्वामी यांनी सहकार्य केले.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Views: 877


