ताज्या घडामोडी

*आंतरराष्ट्रीय शिवपुराण कथाकर प्रदीपजी मिश्रा यांचे राजकिशोर मोदी यांनी आशिर्वाद घेत त्यांना अंबाजोगाई येथे शिव कथेसाठी येण्याचे दिले निमंत्रण *

*आंतरराष्ट्रीय शिवपुराण कथाकर प्रदीपजी मिश्रा यांचे राजकिशोर मोदी यांनी आशिर्वाद घेत त्यांना अंबाजोगाई येथे शिव कथेसाठी येण्याचे दिले निमंत्रण *

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- आंतरराष्ट्रीय शिवपुराण कथाकर प्रदीपजी मिश्रा हे वैकुंठवासी गुरुमाऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे सात दिवसीय शिवकथा करण्यासाठी आले असतांना अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधुर अशा शिवकथेचा आस्वाद घेतला. या शिवकथे दरम्यान राजकिशोर मोदी यांनी प्रदीपजी मिश्रा यांची आशिर्वादपर भेट घेऊन त्यांना अंबाजोगाई शहरात येऊन शिवकथा घेण्याचे निमंत्रण दिले .

दि 8 ते 14 जून या काळात श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत परमपूज्य वंदनीय ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आंतरराष्ट्रीय शिव पुराण कथाकर प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमंगल अशा शिवकथेचे आयोजन करण्यात आले होते. या शिवकथेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन लाखोंचा जनसमुदाय कथेचा आस्वाद घेण्यासाठी सहभागी झाला होता. या कथेप्रसंगी महाराष्ट्रातुन अनेक थोर संत विभूती , राजकीय नेते हे मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिले होते. यामध्ये काशीपीठ येथील मठाधिपती, परमपूज्य शंकराचार्य महाराज यांच्यासह अनेक संत श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे येऊन उपस्थित शिवप्रेमी तसेच परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे अनुयायी यांना आपले आशिर्वचन दिले.
याच शिवपुराण कथे दरम्यानच अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी देखील या शिवकथेत सहभागी झाले होते. या भेटीत त्यांनी अंबाजोगाई शहर हे प्राचीन सांस्कृतिक असे शहर असून या शहरात महाराष्ट्राचे आराध्य माता श्री योगेश्वरी देवी, मराठीचे आद्यकवी स्वामी मुकुंदराज यांची समाधी, बुट्टेनाथ डोंगरकडा, दासोपंत यांची पासोडीची ओळख करवून देत या शहराने राज्याला दिलेले अनेक थोर स्वातंत्र्य सैनिक यासह अंबाजोगाई शहराची ओळख असल्याचे प्रदीपजी मिश्रा यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनीही अंबाजोगाई शहराची सांस्कृतिक ओळख जाणून घेतल्यानंतर अंबाजोगाई शहरात शिवकथा घेण्यासाठी येण्यासाठी अनुकूलता दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!