इतर मुलांशी का बोलतेस? म्हणत भररस्त्यात तरुणीला काठीनं मारहाण, अकोल्यात तरुणाचा संतापजनक प्रकार
इतर मुलांशी का बोलतेस? म्हणत भररस्त्यात तरुणीला काठीनं मारहाण, अकोल्यात तरुणाचा संतापजनक प्रकार
अकोला
इतर मुलाशी का बोलतेस म्हणून भर रस्त्यात एका तरुणाने सोबतच्या तरुणीला काठीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आसुन या प्रकरणी अकोला येथील खदान पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
खादान पोलीस स्टेशन हद्दीतील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणारा मुलगा आणि पीडित मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत .व्हिडिओमध्ये संबंधित मुलगा मुलीला जोरजोरात काठीने मारहाण करताना दिसतोय .
राज्यभरात महिलांवर होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना अकोल्यातील एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे . ‘तू इतर मुलाशी का बोलते? या कारणावरून भर रस्त्यात एका मुलीला हातातील काठीने जबर मारहाण केल्याची घटना अकोल्यात घडली आहे .मुलगा आणि मुलगी दोघेही जण अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे .मारहाण करत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय . व्हिडिओमध्ये संबंधित मुलगा मुलीला जोरजोरात काठीने मारहाण करताना दिसतोय .तू इतर मुलांची का बोलते ?या कारणावरून त्यानेही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे .विशेष म्हणजे रस्त्यावर घडलेल्या या घटने दरम्यान मारहाण करत असताना कोणीही या मुलाला रोखण्याचाही प्रयत्न केलेला नाही .या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेतलीय .त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेत त्यांची भेट घेतल्यानंतर अखेर मुलीचे आईने मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे .या प्रकरणात पोलिसांनी विनयभंगासह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत .दरम्यान मारहाण करणाऱ्या मुलाचा खदान पोलीस शोध घेत आहेत .
