जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ ठार तर पाच जण गंभीर जखमी
जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ ठार तर पाच जण गंभीर जखमी
पुणे
जेजुरी मोरगाव रोड वर झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार तर पाच जण गंभीर रित्या जखमी झाले असून सर्व जखमेवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
याविषयी प्राप्त माहिती अशी की जेजुरी ते मोरगाव कडे जाणाऱ्या रोड वरील किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर एक भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आसुन एम एच ४२ ए एक्स १०६०) जेजुरीकडून मोरगाव कडे जात असताना श्रीराम ढाब्या समोर पिकअप टेम्पोला ( क्र. एम एच १२ एक्स एम ३६९४ ) मधील साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कार ( क्र.एम एच १२ टी के ९४८३) ला स्वीफ्ट कार जाऊन धडकली. या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर स्वीफ्ट डिझायर कार मधील तिघे जण जागेवरच ठार झाले आहेत. तर दोन मुले, एक महिला, दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
