बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीत गुटख्याची अवैध रित्या वाहतूक, 5 लाख 34 हजार रुपयाचा ऐवज जप्त, स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाची कार्यवाही
बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीत गुटख्याची अवैध रित्या वाहतूक, 5 लाख 34 हजार रुपयाचा ऐवज जप्त, स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाची कार्यवाही
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
स्वतःच्या कारमधून गुटख्याची अवैध रित्या वाहतूक करणारे परळी तालुक्यातील धर्मापुरी येथिल राहिवासी बालाजी सौदागर फड यास बीड येथिल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्याचे कडून डिझायर कार सह 5 लाख 34 हजार रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उप निरीक्षक सुशांत सुतळे यांच्या मार्गदर्शना खाली पो हवा रामचंद्र केकान, पोना गोविंद भताने व पो शी सचिन आंधळे यांच्या टीमला आज दिनांक 23/07/2025 रोजी बर्दापूर पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, उजनी पाटी नजीक एक ईसम अवैध रित्या स्वतःच्या कारमधून गुटख्याची अवैध रित्या वाहतूक करत आहे.
या गोपनीय माहिती च्या आधारे या टीम ने सापळा रचुन सदर एम एच 24 ए बी 0426 ही डिझायर कार ताब्यात घेऊन पाहणी केली असता या कार मध्ये वेग वेगळ्या कंपनीचा पान मसाला, गुटखा असा एकूण कार सह 5 लाख 34 हजार रुपयाचा ऐवज जप्त करून बालाजी सौदागर फड वय 25 राहणार धर्मापुरी याचे विरुद्ध बर्दापूर पो स्टे मध्ये गुन्हा दाखल केला आहे.



