अंबाजोगाई येथे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 लाख 75 हजार रुपयाचा गुटका केला जप्त गोविंद शेप यास अटक
अंबाजोगाई येथे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 लाख 75 हजार रुपयाचा गुटका केला जप्त गोविंद शेप यास अटक
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
अंबाजोगाई शहरातील गित्ता रोडवर गुप्त माहिती मिळाल्या वरुन बीड येथिल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात 6 लाख 75 हजार रुपयाचा पानमसाला व गुठखा जप्त केला आहे.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शना खाली पो हवा रामचंद्र केकान, पोना गोविंद भताने यांची टीम दिनांक 8/10/2025 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की शहरातील गीता रोडवर एक इसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाला एम एच 13 डी ई 95 17 या टाटा टिगोर या कार मध्ये घेऊन जात आहे, या गोपनीय माहितीच्या आधारे या टीम ने सापळा रचुन सदर कार चा पाठलाग करून छापा टाकला असता त्याच्या कार मधून वेगवेगळ्या कंपनीचा 6 लाख 75 हजार रुपयांचा पान मसाला व गुटखा जप्त केला आहे.
या प्रकरणी गोविंद मधुकर शेप याचे विरुद्ध अंबाजोगाई शहर पो स्टे मध्ये गु.र.न. 0496/25 कलम 123.274.275.223.bns प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आसुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.



