Skip to content
माईर एमआयटी पुणे संचलित कै. दादाराव कराड विद्यालय, नागझरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील माईर एमआयटी पुणे संचलित कै. दादाराव कराड विद्यालय (सेमी इंग्लिश माध्यम) येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. ज्ञान, संस्कार व मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या या स्नेहसंमेलनाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व विश्वशांती प्रार्थनेने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. शाळेच्या शैक्षणिक, सहशैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेणारा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री अंकुश शिंदे सर (निवृत्त आयपीएस, पोलीस आयुक्त) उपस्थित होते. तसेच मा. श्री बिपिन क्षीरसागर सर (संचालक, साहित्य निकेतन ग्रंथालय, अंबाजोगाई) यांनी सन्माननीय अतिथी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
पालक प्रतिनिधी म्हणून डॉ. रवींद्र इटके सर, तर शाळेच्या माजी विद्यार्थिनी कु. अर्चना गुट्टे यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.
कार्यक्रमाला माईर एमआयटी पुणेचे चेअरमन मा. श्री तुळशीराम अण्णा कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थितांना नवचैतन्य मिळाले. यावेळी अंबाजोगाई शालेय विभागाचे कार्यकारी संचालक मा. श्री राजेशजी कराड सर व आदरणीय सौ. शुभांगी ताई कराड मॅडम यांची उपस्थिती कार्यक्रमाचा मान वाढवणारी ठरली.

मंचावर अंबाजोगाई शालेय विभागाचे संचालक श्री संगप्पा तळेवाड सर, कै. दादाराव कराड विद्यालयाचे प्राचार्य श्री रामराजे कराड सर, सरस्वती पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री सागर राऊत सर, उपप्राचार्य श्री शरद बोंदर सर, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री भस्मे सर तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.केंद्रे एस.एन.उपस्थित होते.
यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा व कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.तसेच मा.सौ.केंद्रे एस.एन व मा.श्री सुजित जावळे यांनाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी सादर केलेले गणपती नृत्य, स्वागतगीत,देशभक्तीपर गीत, सामाजिक विषयांवरील नाट्यछटा, शिक्षण व मोबाईल व्यसनमुक्तीवरील सादरीकरण,‘संत ज्ञानेश्वर’ नाट्यप्रयोग व पसायदान या सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन व पसायदानाने झाला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post Views: 422
error: Content is protected !!