Wednesday, February 4, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्याने हेल्मेट वापरण्या संदर्भात पोलीस खात्याच्या वतीने जनजागरण करण्यात येत असतानाच केवळ हेल्मेट नसल्याने  वाहनाला धडक लागून झालेल्या अपघातात हर्षद धस इसम गंभी

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्याने हेल्मेट वापरण्या संदर्भात पोलीस खात्याच्या वतीने जनजागरण करण्यात येत असतानाच केवळ हेल्मेट नसल्याने  वाहनाला धडक लागून झालेल्या अपघातात हर्षद धस इसम गंभीर जखमी 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

    राज्यभर रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु असताना व हेल्मेट वापरण्या संदर्भात पोलीस खात्याच्या वतीने जनजागरण करण्यात येत असताना केवळ हेल्मेट परिधान न केल्यामुळे अंबासाखर ते लातूर टी पॉईंट या रोडवर वाहनाला धडक लागून झालेल्या अपघातात हर्षद सुनील धस रा. सांगवी तालुका केज,जिल्हा बीड हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

   या अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी 

पोलिस हवालदार  प्रवीण उळे, पोलीस हवालदार करवंदे, चालक HC बाबुराव घुगे यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले व 

जखमी रोडवर गंभीर रित्या जखमी अवस्थेत पडलेल्या हर्षद धस यास स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवून त्यावर उपचार सुरु केले. या जखमीची प्रकृती चिंताजनक असून राज्यभर रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु असताना आणि बीड पोलिसांच्या वतीने हेल्मेट वापरण्या संदर्भात जनजागृन सुरु असताना या  इसमाने केवळ हेल्मेट न घातल्याने अपघातामध्ये त्याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला असून हेल्मेटचा वापर न केल्यामुळे या इसमाची प्रकृती डोक्यास मार लागल्याने गंभीर झालीआहे.

पोलीस निरीक्षक खोकले यांचे आवाहन

   अंबाजोगाई ग्रामीण पो स्टे चे पोलीस निरीक्षक मुरलीधर रा खोकले यांनी या  अपघाताच्या अनुषंगाने जनतेस आव्हान केले आहे की “मोटरसायकल स्वारांनो हेल्मेटचा वापर करा आणी गंभीर अपघात टाळा. हेल्मेट चा वापर केल्यामुळे आपण स्वतः  जखमी होण्यापासून सुरक्षित राहू शकतो.आपला मृत्यू आपण टाळू शकतो . प्रत्येकाने आपली कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली जबाबदारी म्हणून सर्व मोटरसायकल स्वारांनो हेल्मेट वापरा. जीव घेणा अपघात टाळा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!