स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिरसाळा पोलीस स्टेशन हद्दी मध्ये अवैध वाळुने भरलेला हायवा टिप्पर पकडला, कार्यवाहीत 25 लाख 25 हजार रुपयाचा एवज जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिरसाळा पोलीस स्टेशन हद्दी मध्ये अवैध वाळुने भरलेला हायवा टिप्पर पकडला, कार्यवाहीत 25 लाख 25 हजार रुपयाचा एवज जप्त

अंबाजोगाई (प्रतिनिधी )
बीड येथिल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिरसाळा पोलीस स्टेशन हद्दी मधील गव्हाणे कवडगाव ते कासरवाडी येणाऱ्या रोड अवैध वाळुने भरलेला हायवा टिप्पर पकडून केलेल्या कार्यवाहीत 25 लाख 25 हजार रुपयाचा एवज जप्त केला आसुन एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे सक्त आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक सुशांत सुतळे, पो हे कॉ रामचंद्र केकान, दिलीप गीते, पोलीस नाईक गोविंद भताने, पो कॉ सचिन आंधळे यांची टीम दिनांक 25/01/2026 रोजी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास सिरसाळा परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली गव्हाणे कवडगाव ते कासरवाडी येणाऱ्या रोडने एक अवैध वाळुने भरलेला हायवा टिप्पर ज्या मध्ये वाळूची चोरटी वाहतूक करून त्याची विक्री करण्यासाठी येणार आहे.
या गोपनीय माहितीच्या आधारे या टीम ने सापळा रचुन एम एच 44-यु 0887 या क्रमांक असलेल्या वाळूच्या हायवाचा पाठलाग करून त्याला अडवले आणि आतील वाळू सह हायवा ज्याची किंमत 25 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सुरेश विष्णू गित्ते रा वाघबेट याचे विरुद्ध सिरसाळा पो स्टे मध्ये गु.र.न. 20/25 कलम 303(2)3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आसुन आरोपी सुरेश गित्ते यास अटक करण्यात आली आसुन हायवा मालक फरार आहे.


