Monday, May 4, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद घटना उघडकीस ५० वर्षीय नराधम आजोबाने स्वतःच्या ३ वर्षांच्या नातीवर केला वारंवार लैंगिक अत्याचार 

नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद घटना उघडकीस

५० वर्षीय नराधम आजोबाने स्वतःच्या ३ वर्षांच्या नातीवर केला वारंवार लैंगिक अत्याचार 

केज (प्रतिनिधी) : 

    पुणे जिल्ह्यातील नसरापूर या ठिकाणी चिमुकलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याच्या घटनेने संपूर्ण राज्य सुन्न झालेले व सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद घटना उघडकीस आली आसुन एका ५० वर्षीय नराधम आजोबाने स्वतःच्या अवघ्या ३ वर्षांच्या नातीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

     1 मे या महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या नसरापूर या ठिकाणी एका 65 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला जीवे मारले. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आरोपीस फाशी देण्यात यावी या मागणीसाठी पुणे या ठिकाणी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले सर्वत्र संताप व्यक्त होत असताना आणि ही घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत असाच प्रकार उघडकीस आला आहे. 

    प्राप्त माहितीनुसार, पीडित चिमुकली आपल्या आईसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत युसूफ वडगाव या आजोळी आली होती. या दरम्यान १६ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत आरोपी आजोबाने तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

पीडित मुलीला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने तिने आईकडे घडलेला प्रकार सांगितला. आपल्या वडिलांनीच पोटच्या नातीसोबत असे कृत्य केल्याचे समजताच आईला मोठा धक्का बसला. त्यानंतर तिने तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

   या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२), ६५ (२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

     गुन्हा दाखल होताच पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला १ मे रोजी रात्री उशिरा अटक केली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

 घटने संदर्भात ग्रामस्थ अनभिन्न वास्तव समोर येण्याची आवश्यकता 

 युसुफ वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ज्या गावांमध्ये ही घटना घडल्याची पोलिसात नोंद करण्यात आलेली आहे त्या गावातील ग्रामस्थ मात्र या घटने संदर्भात अनभिज्ञ असून केवळ चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरून ज्यांच्या वरती हा अत्याचाराचा आरोप करण्यात आलेला आहे तो व्यक्ती आणि सदरील तक्रारदार महिला यांच्यात मागील काही महिन्यापासून अंतर्गत वाद सुरू होता अशी ही माहिती समोर आल्याने आज तरी ग्रामस्थ या घटनेवर विश्वास ठेवण्यास तयार नसून या घटनेचे वास्तव समोर यावे अशी ग्रामस्थ इच्छा व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!