Skip to content
सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने 6 लाख 54 हजार रु चा गुटखा व पान मसाला केला जप्त, आरोपीवर केली कार्यवाही

केज (प्रतिनिधी)
केज येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला 6 लाख 54 हजार रु चा गुटखा व पान मसाला जप्त केला असून आरोपीवर कार्यवाही केली आहे.
दिनांक 23.05.2026 रोजी 15.00 वा सुमारास श्री. वेंकटराम (आ.पो.से) सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज जि.बीड यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीती वरुन मा. पोलीस अधीक्षक बीड नवनीत कावत मा.अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम, श्री. वेंकटराम (भा.पो.से) सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज जि. बीड यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पो. हवा/1687 धोंडीराम मोरे, पो. हवा/1051 राजु वंजारे, पो. हवा/1885 सचिन क्षीरसागर या विशेष पथकाने पोलीस ठाणे युसुफवडगाव ता. केज जि. बीड हाद्दीमध्ये धाड टाकून संजय रामलिंग तपसे वय 47 वर्षे रा. चंदनसावरगाव ता. केज, जि. बीड यास महाराष्ट्रात विक्री करण्यास प्रतिबंधीत असलेला गुटखा / पानमसाला ज्यामध्ये विमल पान मसाला, दिलबाग पान मसला, गोवा गुटखा 1000 तसेच वाहतुक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन महींद्र TUV-300 जिचा पासींग क्रमांक MH-46-BK-8119 असा एकुण 653945/- रुपयाचा मुद्देमासह ताब्यात घेतले.
संजय तपसे यास मुद्देमाल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता त्याने हा मुद्देमाल रंजीत नागनाथ आगाडे रा.इंदीरा नगर, कळंब जि. धाराशिव यांचे कडुन आणल्याचे सांगितले. या दोघा विरुध्द पो. हवा/1687 धोंडीराम योगीराज मोरे नेमणुक विशेष पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज जि.बीड पो.स्टे युसुफवडगाव ता. केज जि.बीड येथे दिलेल्या फिर्याद वरुन गु.र.नं 142/2026 कलम 123,274,275 भा. न्या. संहीता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Post Views: 225
error: Content is protected !!