*शॉर्टसर्किटने पत्रकार प्रशांत मस्के यांचे घर व कपड्यांचे दुकान जळून खाक; ₹1.61 लाखांचे नुकसान*
*शॉर्टसर्किटने पत्रकार प्रशांत मस्के यांचे घर व कपड्यांचे दुकान जळून खाक; ₹1.61 लाखांचे नुकसान*

अंबाजोगाई प्रतिनिधी :
विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पत्रकार प्रशांत रघुनाथ मस्के यांचे घर व कपड्यांचे दुकान जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत घरातील फर्निचर, टीव्ही, कुलर, वॉशिंग मशीन तसेच दुकानातील साड्या व इतर कपड्यांसह मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नष्ट झाले.
प्राथमिक माहितीनुसार, विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून या दुर्घटनेत अंदाजे 1 लाख 61 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे घरगुती साहित्य आणि व्यावसायिक माल दोन्हीचे मोठे नुकसान झाल्याने मस्के कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटील सरपंच, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नुकसानीचा पंचनामा करून संबंधित अहवाल प्रशासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


