दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध अंबाजोगाई पोलिसांची धडक कारवाई कलम १८५ अन्वये चार जणांवर गुन्हे दाखल
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध अंबाजोगाई पोलिसांची धडक कारवाई
कलम १८५ अन्वये चार जणांवर गुन्हे दाखल
अंबाजोगाई : दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चार जणांविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईत उद्धव अंकुश शिंगारे, भगवंत ज्योतीराम रूपनर, बालाजी संजय कचरे आणि अशरफ शेख अजमद यांच्याविरुद्ध अनुक्रमे गुन्हा क्रमांक ४२१/२०२६ ते ४२४/२०२६ नुसार कारवाई करण्यात आली.
दारूच्या नशेत वाहन चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघातांना आळा घालून नागरिकांचे जीव सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक चेतना मॅडम व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस अंमलदार बदाम आरसूळ, दत्ता इंगळे, मुकेश खरटमोल व त्र्यंबक फड यांनी कारवाईत सहभाग घेतला.
कारवाई सातत्याने सुरू राहणार
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्धची विशेष मोहीम नियमितपणे सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
“दारू पिऊन वाहन चालवू नका—स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका.” असे आवाहन अंबाजोगाई शहर पोलिसांनी केले आहे.



