पोलीस स्टेशन केज यांची गोवंश तस्करीवर कार्यवाही, 6 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस स्टेशन केज यांची गोवंश तस्करीवर कार्यवाही, 6 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
केज (प्रतिनिधी )
केज येथील पोलीस सब इन्स्पेक्टर असुद शेख व त्यांचे सहकारी नाईट पेट्रोलिंग करत आसताना त्यांनी संशयित वाहनास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यामध्ये त्यांना सात गोवंश मिळून आल्याने पोस्टे केज येथे गुन्हा दाखल केला असून आरोपी कडून 6 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
या विषयी प्राप्त माहिती अशी की, 24/06/2026 रोजी केज पोलीस स्टेशनचे चाँदपाशा शेख वय 38 वर्षे व्यवसाय नौकरी सपोनि हे चालक पोअ 488 शिंदे व होमगार्ड 1842 यांचेसह पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना दि 25/06/2026 रोजी पहाटे 03.40 वाजता उमरी टोल नाक्याकडुन केज कडे येत असतांना टोलनाका येथे तपकीरी रंगाचा आयशर क्र एम MH 04 FJ 4337 यातुन जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने सदरील आयशर गाडीला टोल नाका पासुन पुढे शंभर फुट अंतरावर त्यांनी सदर वाहनाचे चालकास ईशारा करून आयशर थांबवण्यास सांगीतल्याने चालकाने सदर आयशर थांबवला, त्यांनी सदर आयशर चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मोबीनखान शेरखान क्य 47 वर्षे रा. रोशनपुरा नेकनूर ता. जि. बीड असे सांगितले. आयशर चालकास आयशर मध्ये काय आहे? असे विचारले असता, त्याने मध्ये गोवंश जातीचे जनावरे असल्याचे सांगितले. त्यास वाहतुकीचा परवाना व जनावरांचे दाखले आहेत काय ? असे विचारले असता त्याने वाहतुकीचा परवाना व जनावरांचे दाखले नसल्याचे सांगितले. जनावरे कोणाची आहेत असे विचारले असता त्याने जनावरे हे माझी आहेत असे सांगितले त्या नंतर वाहनास पोलीस स्टेशन केज येथे आणुन
रीतसर कार्यवाही करत गुन्हा र न 395/26 नुसार गुन्हा दाखल करून वहान क्र. MH 04 FJ 4337 किंमत अंदाजे 3,50,000/- रुपये व सात बैल असा
6,29,000/- रुपयेचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केला असून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री वेंकटराम सर, पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री असद शेख यांच्या पथकाने केलेल्या या कार्यवाहीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक श्री नवनीत गावत व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम यांनी अभिनंदन केले



