Skip to content
*गटशिक्षण अधिकारी एम. एस. सुवर्णकर यांची डॉ. म. इकबाल प्राथमिक शाळेला भेट*

अंबाजोगाई ,/ अंबाजोगाई तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी एम. एस. सुवर्णकर यांनी गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) क्रांतिनगर, मोरेवाडी येथील डॉ. म. इकबाल प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक कामकाजाचा व विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांच्या भेटीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शाळेत आगमन झाल्यानंतर मुख्याध्यापक शेख उमर फारूक यांनी सुवर्णकर सर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी शाळेच्या वतीने त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
भेटीदरम्यान गटशिक्षण अधिकारी सुवर्णकर यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेतील शैक्षणिक वातावरण तसेच विविध उपक्रमांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी पाहणी केली. शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने नाविन्यपूर्ण व विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबवावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी डॉ. म. इकबाल माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शेख मुजाहेद हे उपस्थित होते. त्यांनीही सुवर्णकर सरांचे स्वागत करून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली.
गटशिक्षण अधिकारी यांच्या या भेटीमुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीस नवी प्रेरणा मिळाली असून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रम आपुलकीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Post Views: 106
error: Content is protected !!