Sunday, August 16, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्राचे  पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या धडाकेबाज कार्यवाहीची राज्य शासनाकडून दखल  नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शहाजी उमाप ‘अति-उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित 

 नांदेड परिक्षेत्राचे  पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या धडाकेबाज कार्यवाहीची राज्य शासनाकडून दखल 

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शहाजी उमाप ‘अति-उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित 

नांदेड : (प्रतिनिधी)

   पोलीस सेवेत दीर्घकाळ उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण आणि निष्कलंक सेवा बजावणाऱ्या राज्यातील ११ पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना  आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ देऊन राज्य शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले असून या मानाच्या पदकाचे मानकरी ठरलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा समावेश आसल्याने उमाप यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    पोलीस दलात दीर्घकाळ उत्कृष्ट व निष्कलंक सेवा बजावणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘उत्कृष्ट सेवा पदक’ आणि ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात येते. शहाजी उमाप यांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची तसेच धडाकेबाज कार्यवाहीची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पदकासाठी निवड करण्यात आली आहे.

*अंबाजोगाईतीपोलीस दलात दीर्घकाळ उत्कृष्ट व निष्कलंक सेवा बजावणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘उत्कृष्ट सेवा पदक’ आणि ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात येते. शहाजी उमाप यांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची तसेच धडाकेबाज कार्यवाहीची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पदकासाठी निवड करण्यात आली आहे.ल धडाकेबाज कारकीर्दीने मिळवली वेगळी ओळख*

    सन १९९९-२००० च्या दरम्यान शहाजी उमाप हे अंबाजोगाई येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या धडाकेबाज पोलीस कार्यवाहीमुळे त्यांच्या कार्यशैलीची परिसरात विशेष चर्चा झाली होती. गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका, प्रभावी तपास आणि कायद्याची अंमलबजावणी यामुळे त्यांच्या कार्याची वेगळी ओळख निर्माण झाली.

    अंबाजोगाईतील त्यांच्या या कार्यकाळापासूनच त्यांच्या धडाकेबाज कार्यवाहीची चर्चा सुरू झाली. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांची कारकीर्द त्यावेळीच ‘सिंघम अधिकारी’ म्हणून राज्यभर चर्चेत आली होती. त्यानंतरच्या प्रदीर्घ सेवाकाळातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्या कार्यशैलीची छाप कायम ठेवली.

*’धडाकेबाज अधिकारी’ म्हणून सातत्याने चर्चेत*

पोलीस सेवेत विविध पदांवर काम करताना शहाजी उमाप यांनी कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारीविरोधातील कारवाई तसेच पोलीस प्रशासनाच्या विविध आघाड्यांवर प्रभावीपणे काम केले. त्यांच्या कार्यपद्धतीतील तत्परता, निर्णयक्षमता आणि कठोर अंमलबजावणी यामुळे ते सातत्याने चर्चेत राहिले.

अंबाजोगाईपासून सुरू झालेली त्यांच्या धडाकेबाज कार्याची वाटचाल आज नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक या महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचली आहे.

    राज्यातील ११ उपमहानिरीक्षकांचा गौरव स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा गौरव करण्यात आला. यामध्ये राज्यातील ११ पोलीस उपमहानिरीक्षकांना ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले असून, त्यात शहाजी उमाप यांचा समावेश आहे.

    जवळपास अडीच दशकांच्या पोलीस सेवेत त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्यांना ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आणि आज 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शहाजी उमाप यांना हे पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

    हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कामगिरीचा गौरव नसून, पोलीस सेवेत त्यांनी प्रदीर्घ काळ जपलेल्या कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि उल्लेखनीय कार्याची शासनाने घेतलेली दखल आहे.

   शहाजी उमाप यांना मिळालेल्या या सन्मानामुळे अंबाजोगाईपासून नांदेडपर्यंतच्या त्यांच्या प्रदीर्घ पोलीस कारकीर्दीचा गौरव झाला असून, त्यांच्या सहकाऱ्यांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

धडाकेबाज कार्यवाहीपासून उत्कृष्ट सेवापदकापर्यंतची शहाजी उमाप यांची ही वाटचाल निश्चितच पोलीस दलातील उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कारकीर्द ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!