Skip to content
*योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये सीएनसी प्रशिक्षण उत्साहात संपन्न*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे (MSBTE) प्रायोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यक्रम (FDP) कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक,अंबाजोगाई येथे १७ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘सीएनसी प्रोग्रामिंग आणि मशीनिंग’ (CNC Programming and Machining) या विषयावर आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.चंद्रशेखर बर्दापूरकर उपस्थित होते. या समारोप प्रसंगी बर्दापूरकर यांनी ग्रामीण भागातील तंत्रनिकेतनमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता योगेश्वरी पॉलीटेक्निक मधील सीएनसी मशीन उपलब्ध असल्याची माहिती दिली. यावेळी तज्ञ मार्गदर्शक नितीन नाईक, संस्थेचे सचिव श्री कमलाकरराव चौसाळकर व प्राचार्य रमण देशपांडे यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रशिक्षणार्थी सहभागी प्राध्यापकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता योगेश्वरी पॉलीटेक्निक तर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची प्रशंसा केली. या समारोप समारंभाचे प्रास्ताविक मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा.शाम गडदे यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्रा.बाप्पासाहेब सोनवणे, प्रा. नंदकिशोर थोरात, प्रा.सचिन हारे यांनी मेहनत घेतली.
Post Views: 98
error: Content is protected !!