Tuesday, November 17, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान अंबाजोगाईत तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे आयोजन*

*25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान अंबाजोगाईत तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे आयोजन*

*अतुल पेठे यांच्या हस्ते उद्घाटन तर न्या. प्रकाश परांजपे यांच्या उपस्थितीत समारोप*

*उद्घाटन समारंभ, कविसंमेलन,बाल आनंद मेळवा, गझल गायन, समारोप समारंभ, पुरस्कार वितरण व संगीत सभा खास आकर्षण*

अंबाजोगाईः (प्रतिनिधी)

      यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ४२ वे वर्ष असून तीन दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, बालआनंद मेळावा, गझल गायन, शालेय चित्रकला स्पर्धा व बक्षीस वितरण, समारोप समारंभ त्यात वार्षिक यशवंतराव चव्हाण स्मृती विविध क्षेत्रातील मान्यवर यांना पुरस्कार वितरण, शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत गायन संपन्न होणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचार व कृतिला अनुसरून आयोजित केलेला समारंभ याची अंबाजोगाई परिसर, मराठवाडा व महाराष्ट्रात ख्याती आहे. अभिरुची असलेला रसिक वर्ग उत्कंठा लावून वाट पाहत असतो. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे पाईक स्व. भगवानराव लोमटे यांच्या कल्पनेतून हा समारंभ सुरू झाला. त्याचे सातत्याने आयोजित केला जातो. या वर्षी त्याचे ४२ वे वर्ष आहे. अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईचे सचिव दगडू लोमटे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

*उद्घाटन व कविसंमेलन*

यार्षीच्या समारोहचा उदघाटन बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुणे येथील नाटककार, लेखक, अभिनेता व माहितीपटकार अतुल पेठे यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. तर रात्री ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी अमरावती येथील सुप्रसिद्ध कवी, गझलकार नितीन देशमुख हे राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन इचलकरंजी येथील कवी रोहित शिंगे हे करणार आहेत. तर इतर कवी आत्तम गेंदे ल-पालम, रंजना गायकवाड-अहमदपूर, एजाज शेख-अकोला, अपूर्व राजपूत-सोयगाव, विजया टाळकुटे-जेजुरी, प्रमोद राठोड–नाशिक व अविनाश पोइनकर-चंद्रपूर यांचा सहभाग राहणार आहे.

*बाल आनंद मेळावा व गझल गायन*

गुरूवार, दि.२६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वा. बालआनंद मेळावा आयोजित केला असून सुप्रसिद्ध कवी, बालसाहित्यिक प्रभाकर साळेगावकर माजलगाव हे शालेय विद्यार्थ्यांना कविता, गप्पागाणी, कथा सांगून मार्गदर्शन करतील रात्री ८ वा. हाज़िर-ए-ग़ज़ल हा गझल गायनाचा कार्यक्रम होईल. सुप्रसिद्ध गझल गायक पद्मश्री हरिहरन यांचे शिष्य प्रसिद्ध युवा गझल गायक भाविक राठोड, पुणे हे गझल गायन सादर करतील. युवा गायिका ऋतुजा वानखडे व सुवर्णा कोळी या गायनाला साथ देतील, धवल जोशी – बासरी, स्वप्नील जोशी – कीबोर्ड, मिलिंद शेवरे–गिटार हे साथसंगत करतील व नासिर खान हे निवेदक असणार आहेत.

शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता ऐच्छिक विषय घेऊन ८–१० वी विद्यार्थ्याची खुली चित्रकला स्पर्धा होईल व त्यानंतर बक्षीस वितरण होईल. २५ नोव्हेंबर रोजी शहरातील शाळा अंतरंगत रंगभरण स्पर्धा आयोजित केल्या जातील. यावेळी दोन्हीही स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रसिद्ध चित्रकार अमृतराव टेकाळे गुरुजी यांच्या हस्ते होईल.

*समारोप व पुरस्कार वितरण*

याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता समारोप समारंभ होईल. सुप्रसिद्ध वक्ते, विचारवंत व माजी न्यायाधीश प्रकाश परांजपे, धुळे हे अध्यक्षस्थानी असतील. याच समारंभात यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार सर्वश्री पद्मश्री श्रीरंग दादा लाड – परभणी यांना कृषी, श्रध्दा बेलसरे (खारकर)–अंबाजोगाई यांना साहित्य, गंगाधार देव–नांदेड यांना संगीत व सुप्रसिद्ध तरुण गायिका कु. नंदिनी व कु. अंजली अंगद गायकवाड–तांदुळजा ह. मु . पुणे यांना संगीत युवा गौरव पुरस्कार प्रदान केले जातील.

*शास्त्रीय संगीत सभा*

याच दिवशी रात्री ८.३० वाजता पुणे येथील पण तांदुळजा येथील रहिवासी सुप्रसिद्ध युवा गायिका झी युवा संगीत सम्राट विजेती आणि क्लासिकल व्हाईस ऑफ इंडिया विजेती कु. नंदिनी गायकवाड व झी टिव्ही सारेगमप लिटिल चॅम्प विजेती व इंडियन आयडॉल फेम कु. अंजली गायकवाड यांचे शास्त्रीय गायनासोबत भावगीत,भक्तिगीत,गझल,नाट्यगीत सादर करतील. त्यांना अंगद गायकवाड संवादिनी, रोहन गोराने तबला, बंकटकुमार बैरागी–पखवाज व श्रीरूप धाट टाळाची साथसंगत करतील.

*ग्रंथ विक्री व प्रदर्शन*

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ग्रंथ प्रदर्शन व विक्री आयोजित केले आहे. हे तिन्ही दिवस वाचक, रसिक व प्रेक्षकांना पाहता येतील. हे सर्व कार्यक्रम वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात संपन्न होणार आहेत. रसिक श्रोत्यांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे दगडू लोमटे, डॉ. कमलाकर कांबळे, सतीश लोमटे, डॉ. प्रकाश प्रयाग, प्रा. सुधीर वैद्य, प्रा. शर्मिष्ठा लोमटे, प्रा. भगवान शिंदे, त्र्यंबक पोखरकर व राजपाल लोमटे यांनी दिली आहे.

=======================

=======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!