Friday, November 6, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

महिलांसाठी एसटी प्रवासात NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल

महिलांसाठी एसटी प्रवासात NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!

१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ; ग्रामीण भागातील महिलां१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ; ग्रामीण भागातील महिलांसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे एसटी महामंडळाचे निर्देश!साठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे एसटी महामंडळाचे निर्देश!

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला तूर्तास दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणारी कार्ड सक्ती आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून आवश्यक सूचना दिल्या आहेत.
महिला प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता अद्यापपर्यंत केवळ १.१० कोटी NCMC कार्डची नोंदणी व वितरण झाले आहे. विशेषतः ग्रामीण आणि खेड्यापाड्यातील अनेक महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचलेली नसल्याने मोठ्या प्रमाणात कार्ड नोंदणी झालेली नसल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी NCMC कार्डची अनिवार्यता १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे घेण्याचे निर्देश
महिला प्रवाशांना NCMC कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापर्यंत विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश महामंडळाने दिले आहेत. या शिबिरांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
३१ डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत १०० टक्के NCMC कार्ड नोंदणी व वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने ग्रामीण भागातील महिला प्रवाशांना NCMC कार्ड काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. मात्र, महिलांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर कार्ड नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाची सूचना : १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत NCMC कार्डची अनिवार्यता शिथिल करण्यात आली असून, या कालावधीत महिला प्रवाशांनी कार्ड नोंदणी करून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!