Skip to content
शौचास केलेल्या अडीच वर्षीय चिमुकलेवर 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून अत्याचार, अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील घटना

अंबाजोगाई प्रतिनिधी
शोच्यास गेलेल्या अडीच वर्षीय चिमुकलेवर 14 वर्षाच्या बालकाने अत्याचार केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव या ठिकाणी मंगळवारी घडली असून याप्रकरणी बर्दापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव या ठिकाणची रहिवासी असलेली अडीच वर्षीय चिमुकली मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या घरापासून काही अंतरावर शौचास गेली असता तिच्या घरा समोरच राहणाऱ्या 14 वर्षी बालकाने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार सदर चिमुकलीच्या चुलतीच्या निदर्शनास आला होता मात्र प्रकरण कशाला वाढवायचे म्हणून ते पीडित कुटुंब शांत होते मात्र बुधवारी सकाळी चिमुकलीला त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर सर्व प्रकार डॉक्टरांच्या निदर्शनास आला.
त्यानंतर ही माहिती बर्दापूर पोलिसांना मिळाल्यानंतर याप्रकरणी सदरील पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून त्या अल्पवयीन मुलाच्या विरुद्ध बर्दापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६५(२) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
*अल्पवयीन मुलाकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ*
मागील काही दिवसापासून अंबाजोगाई तालुक्यासह अन्य ठिकाणी अल्पवयीन मुलाकडून चिमुकल्या मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले असून हे वाढते प्रमाण पाहता अशा अल्पवयीन मुलाचे समुपदेशन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे हे मात्र निश्चित
Post Views: 326
error: Content is protected !!