केज येथील पोलीस अधीक्षक श्री वेंकटराम यांच्या पथकाने 1 लाख 63 हजार रु किंमतीच्या जनावरांची केली सोडवणूक, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
केज येथील पोलीस अधीक्षक श्री वेंकटराम यांच्या पथकाने 1 लाख 63 हजार रु किंमतीच्या जनावरांची केली सोडवणूक, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
केज (प्रतिनिधी )
गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने 8 जनावरे बांधुन ठेवल्याचे मिळुन आल्याने केज येथील साहेब पोलीस अधीक्षक श्री वेंकट राम यांच्या पथकाने 1 लाख 63 हजार रु किंमतीच्या जनावरांची सोडवणूक करत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
श्री. नवनीत कावत (भा.पो.से), पोलीस अधीक्षक बीड, चेतना तिडके मॅडम, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्री. वेंकटराम (भा. पो. से), सहायक पोलीस अधीक्षक, केज जि.बीड, यांचे मार्गदर्शना खाली ग्रे. पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पो. हवा/996 बालासाहेब डापकर, पो. हवा/1687 धोंडीराम मोरे, पो.हवा/1051 राजु वंजारे, पो. ह्या/1885 विशाल क्षीरसागर, पो. ह्या/1384 विकास चोपणे नेमणुक विशेष पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज जि. बीड यांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून दिनांक 27.05.2026 रोजी 11.00 वा सुमारास भागवत बारीकराव पारवे रा. केज जि.बीड, नौशाद उस्मान कुरेशी रा. कुरेशी मोहल्ला, केज जि. बीड यांनी गोवंश जातीच्या जनावरांची कतल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेली असताना बैल जातीचे गोरे व गाय असे एकुण 08 किंमत अंदाजे 1,63,000/- रुपये चे जनारांसह मिळुन आल्या मुळे त्यांचे विरुध्द पो.हवा/1051 राजु रुपचंद वंजारे नेमणुक विशेष पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज जि. बीड यांचे फिर्याद वरुन गु.र.नं प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्या बाबत अधिनियम 1960 सह कलम 5 (ब),9 महाराष्ट्र पशु संरंक्षण सुधारणा अधिनियम 1976 सह कलम 118, 119 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.



