ताज्या घडामोडी

अंबाजोगाई शहर पोलीसांची मोठी कारवाई 7.90 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त

अंबाजोगाई शहर पोलीसांची मोठी कारवाई 7.90 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

     अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे परळी वेस परिसरात कारवाई करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला 7.90 लाख रुपयाचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला.

     पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, प्रभारी पोलीस अधीक्षक सौ. चेतना मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश शिंदे सर तसेच अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे, पोलीस हवालदार नागरगोजे, पोलीस नाईक तेजस वावळे, पोलीस अंमलदार राठोड, पोलीस शिपाई हनुमंत चादर व सुशांत गायकवाड या पथकाने सापळा रचून एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन (क्र. MH-44-B-2529) थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विमल पान मसाला, विडी-1 तंबाखू, प्रीमियम गोवा 1000 मसाला, प्रीमियम राज निवास सुगंधी पान मसाला, प्रीमियम ZL-01 जाफरानी जर्दा पान मसाला, डॉक्टर स्पेशल पान मसाला व प्रीमियम शॉर्ट लक्झरी सेव्हन टोबॅको पान मसाला यांचा समावेश आहे. प्रतिबंधित मालाची किंमत ₹3,40,020/- असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाची किंमत ₹4,50,000/- आहे. असा एकूण ₹7,90,020/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शशिकांत शिवाजी बुलबुले (वय 25 वर्षे, रा. शिक्षक कॉलनी, मोरेवाडी, अंबाजोगाई) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) ससाणे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!