अंबाजोगाई शहर पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी; सोन्याची चैन चोरीचा गुन्हा उघड, आरोपी अटक
अंबाजोगाई शहर पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी; सोन्याची चैन चोरीचा गुन्हा उघड, आरोपी अटक
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे सोन्याची चैन चोरीचा गुन्हा अवघ्या 15 दिवसांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेली सुमारे एक लाख रुपयांची सोन्याची चैन जप्त करण्यात यश मिळविले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 1 जून 2026 रोजी फिर्यादी सुमनबाई मधुकर कांबळे (वय 65, रा. भीमनगर, परळी वैजनाथ, जि. बीड) या शिवाजी चौक ते पंचायत समिती मार्गे घरी जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून भुरळ घातली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सुमारे ₹1 लाख किंमतीची सोन्याची चैन फसवणुकीने चोरून नेली.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास तांत्रिक आणि गोपनीय पद्धतीने करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी दिलीप विश्वनाथ स्वामी (वय 47, रा. महादेव गल्ली, चाकूर, ता. चाकूर, जि. लातूर) याचा शोध घेऊन दि. 14 जून 2026 रोजी त्यास अटक केली.
अटक केलेल्या आरोपीकडून चोरीस गेलेली ₹1 लाख किंमतीची सोन्याची चैन जप्त करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक तेजस वावळे हे करीत आहेत.
सदर गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक नवनीत कावत, मा. प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस नाईक तेजस वावळे, पोलीस हवालदार पांडुरंग काळे, भागवत नागरगोजे, अमोल गायकवाड तसेच पोलीस अंमलदार सुशांत गायकवाड व हनुमंत चादर यांनी पार पाडली.
अवघ्या 15 दिवसांत गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केल्याबद्दल अंबाजोगाई शहर पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


