Tuesday, October 6, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

प्रेमसंबंधाच्या संशयातून प्राध्यापकाचा खून; चौघांवर गुन्हा दाखल  बर्दापूरजवळील खडी केंद्रावर नेऊन करण्यात आली होती बेदम मारहाण 

प्रेमसंबंधाच्या संशयातून प्राध्यापकाचा खून; चौघांवर गुन्हा दाखल 

बर्दापूरजवळील खडी केंद्रावर नेऊन करण्यात आली होती बेदम मारहाण 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

    लातूर शहरातील कन्हेरी चौक परिसरातून प्राध्यापकाचे अपहरण करून प्रेमसंबंधाच्या संशयातून बर्दापूरजवळील खडी केंद्रावर नेऊन बेदम मारहाण करत खून केल्याची घटना समोर आली आहे. माधव ऊर्फ नितीन धनाजी संगमे (वय ३२) असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे.

    मयत संगमे हे लहान भावाच्या साखरपुड्याच्या तयारीसाठी गावी आले होते. रविवारी त्यांना फोन करून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात बोलावण्यात आले. त्यानंतर पृथ्वीराज देशमुख, धवल देशमुख, प्रथमेश रेड्डी व आदित्य भालके या चौघांनी चारचाकी वाहनातून त्यांचे अपहरण केले.

   एका महिले सोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपींनी संगमे यांना बर्दापूर येथील खडी केंद्रावर नेले. तेथे लोखंडी रॉड, बेल्ट व काठ्यांनी मारहाण करण्यात आली. गंभीर मारहाणीत ते बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी त्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

    दरम्यान, सुरुवातीला बर्दापूरजवळ संगमे जखमी अवस्थेत सापडल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, रुग्णालयातील पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला.

    मयताचे भाऊ नरेंद्र संगमे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!