Skip to content
*योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवली फोर व्हीलर*

अंबाजोगाई :- तंत्रशिक्षणात महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील ऑटोमोबाईल विभागात शिकणाऱ्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक मधील उपलब्ध प्रयोगशाळा व वर्कशॉप यामध्ये अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून चार चाकी वाहन तयार केले आहे.हे चार चाकी वाहन कमी खर्चिक, प्रदूषण मुक्त, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आहे. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गास शेती कामासाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणारे वाहन चि.पार्थ वेदपाठक, सुयश महामुनी, रोहन जाधव,नीरज जोगदंड,ऋषिकेश भीसे आर्यन सुरवसे, सुदर्शन कापरे,गणेश सावंत,यशराज काळकुटे,मनीष देशमुख या विद्यार्थ्यांनी बनवले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष श्री.गणपत व्यास, का.उपाध्यक्ष जगदीशराव चौसाळकर, सचिव श्री.कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ.शैलेश वैद्य, सहसचिव प्रा.भीमाशंकर शेटे, संचालक श्री.प्रताप पवार, प्राचार्य रमण देशपांडे व ऑटोमोबाईल विभागाचे प्रमुख प्रा.बाप्पासाहेब सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.
Post Views: 121
error: Content is protected !!