Friday, May 29, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती अंबाजोगाई शहरात विना अध्यक्ष थाटामाटा संपन्न होणार 

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती अंबाजोगाई शहरात विना अध्यक्ष थाटामाटा संपन्न होणार 

अंबाजोगाई (प्रतिनिधी )

   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अंबाजोगाई शहरात विना अध्यक्ष संपन्न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

    31 मे २०२६ रोजी संपूर्ण राज्यभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आंबेजोगाई शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती  मोठ्या थाटामाटात संपन्न होणार असली तरी यावेळी या जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही जयंती विना अध्यक्ष संपन्न होणार आहे. 
    आज पर्यंत दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करत असताना एक उत्सव समिती निर्माण करून या समितीचा एक अध्यक्ष निवडण्यात येत असे. याच अध्यक्षाच्या अधिपत्याखाली ही जयंती उत्साहात साजरी केल्या जात असे मात्र मागील काही वर्षात आलेले कटू अनुभव पाहता यावर्षी साजरी करण्यात येणाऱ्या जयंतीच्या अवचित त्याने एक बैठक नुकतीच शहरातील धनगर गल्ली या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीस शहरातील समाज बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     या बैठकीत सर्व समावेशक चर्चा होऊन 31 मे रोजी संपन्न होणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात सर्व घटकातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही जयंती साजरी करत असताना कोणीही अध्यक्ष असणार नसुन जयंतीनिमित्त विना अध्यक्ष व विना समिती  शहरातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य शोभायात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
    दरम्यान या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून धनगर समाज बांधवांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वच समाज बांधवांनी अनुकरण करून आपापल्या महापुरुषांच्या जयंत्या या पुढे अशाच पद्धतीने विना अध्यक्ष व विना समित्या एकत्रित येऊन साजरा केल्यास अंतर्गत गट बाजा संपुष्टात येण्यास मदत होईल हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!