Skip to content
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मेडिकल कॉलेज विभाग शाळेत श्री.व्यंकटेश चामनर सर यांची विभागप्रमुख पदावर नियुक्ती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कै. देवराव बाळाजी गणगे योगेश्वरी नूतन विद्यालय मेडिकल कॉलेज परिसर (प्राथमिक विभाग) येथे सहशिक्षक म्हणून मागील अठ्ठावीस वर्षांपासूनच्या यशस्वी अध्यापन सेवेनंतर विभागप्रमुख पदावर श्री. व्यंकटेश बापूराव चामनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेच्या आदेशानुसार दिनांक १६ एप्रिल २०२६ पासून मेडिकल परिसर विभागातील संस्थानिर्मित विभागप्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश संस्थेचे मा. सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली जारी करण्यात आले असल्याचे अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. श्री. व्यंकटेश चामनर सर यांच्या नियुक्तीमुळे विद्यालयाच्या कार्यपद्धतीत अधिक शिस्तबद्धता आणि परिणामकारकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवडीचे संस्था अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बर्दापूरकर साहेब, उपाध्यक्ष श्री. गणपत व्यास सर,सचिव श्री. कमलाकर चौसाळकर साहेब, उपाध्यक्ष श्री. जगदीश चौसाळकर साहेब, कार्याध्यक्ष डॉ. शैलेश वैद्य सर तसेच संस्थेच्या संचालक मंडळातील प्रा. भिमाशंकर शेटे सर, प्रा. माणिकराव लोमटे सर, प्रा.एस.एन. गोळेगांवकर सर, प्राथमिक विभाग प्रभारी श्री. पाशू सय्यद सर, श्री. लंकेश वैद्य सर, श्री. अंगद कराड,ॲड. विर्धे मॅडम, प्राचार्य डॉ. एम. व्ही. कानेटकर सर, प्राचार्य एस. पी. कुलकर्णी सर, मुख्याध्यापक श्री. खंडेराव नांदगावकर सर, मंदिर विभाग प्रमुख श्री. सुभाष शिंदे सर,शिक्षक प्रतिनिधी श्री. अनंत जोशी सर, सौ. मंगल पतंगे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 210
error: Content is protected !!