ताज्या घडामोडी

लग्नाचे आमिष दाखवून 28 वर्षीय महिलेवर दोन वर्षे अत्याचार; धर्मांतराचा दबाव आणणाऱ्या आरोपी विरुद्ध अंबाजोगाईत गुन्हा दाखल होताच झाला फरार 

लग्नाचे आमिष दाखवून 28 वर्षीय महिलेवर दोन वर्षे अत्याचार; धर्मांतराचा दबाव आणणाऱ्या आरोपी विरुद्ध अंबाजोगाईत गुन्हा दाखल होताच झाला फरार 

अंबाजोगाई: (प्रतिनिधी)
    लग्नाचे आमिष दाखवून एका २८ वर्षीय महिलेवर दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरात उघडकीस आली आसुन या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून सलमान अजीज पठाण याच्या विरुद्ध फसवणूक, अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पीडितेला लग्नासाठी धर्मांतराची सक्ती केल्याचे तक्रारीत नमूद असून सध्या आरोपी फरार आहे.
    प्राप्त  माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील रहिवासी असलेली पीडित महिला सध्या अंबाजोगाई येथे वास्तव्यास आसुन आरोपी सलमान पठाण याने तिला लग्नाचे स्वप्न दाखवून दोन वर्षांपूर्वी आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, जेव्हा पीडितेने विवाहाचा विषय काढला, तेव्हा आरोपीने तिची फसवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने पीडितेवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला, त्याशिवाय लग्न करणार नाही अशी अट घातली. इतकेच नव्हे तर ‘तुला जे करायचे आहे ते कर’ असे म्हणत त्याने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
    या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ३५२ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. एका महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन त्याच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याच्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरिक्षक जाधवर या प्रकरणाचा पुढील तपास करत आसुन आरोपी सलमान पठाण फरार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!