ताज्या घडामोडी

*योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये दोन नवीन अभ्यासक्रमांना AICTE तर्फे मान्यता*

*योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये दोन नवीन अभ्यासक्रमांना AICTE तर्फे मान्यता*


अंबाजोगाई:- तंत्रशिक्षणात महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअरिंग या दोन नवीन अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली यांच्यातर्फे मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वीच महाविद्यालयात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग,मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व सिव्हिल इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम शिकवले जातात. या सर्व अभ्यासक्रमांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे उत्कृष्ट नामांकन प्राप्त झाले आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मा.डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या संकल्पनेतून वर्ष 2011 मध्ये योगेश्वरी पॉलिटेक्निक या महाविद्यालयाची सुरुवात झाली. आज महाविद्यालयाने 15 वर्षाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असून, महाराष्ट्रातील नामवंत तंत्रनिकेतन म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. या पॉलिटेक्निक मधून आजपर्यंत अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेले असून, विद्यार्थी शासकीय अधिकारी, उद्योजक व कुशल अभियंते म्हणून कार्यरत आहेत. अशी माहिती योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी दिली.
पॉलिटेक्निकच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत असून, विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी फार मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष श्री.गणपत व्यास, का.उपाध्यक्ष जगदीशराव चौसाळकर, सचिव श्री.कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ.शैलेश वैद्य, सहसचिव प्रा.भीमाशंकर शेटे, संचालक श्री.प्रताप पवार यांनी अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!